तुम्ही झोपा आम्ही उठवू - भारतीय रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2017 11:25 AM2017-02-10T11:25:50+5:302017-02-10T11:28:16+5:30
रात्रीच्या वेळी ट्रेन प्रवासामध्ये झोपेसाठी डोळे मिटताना नेहमीच प्रवाशांच्या मनामध्ये ज्या स्टेशनवर उतरायचे आहे त्याआधी जाग आली नाही तर ?
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - रात्रीच्या वेळी ट्रेन प्रवासामध्ये झोपेसाठी डोळे मिटताना नेहमीच प्रवाशांच्या मनामध्ये ज्या स्टेशनवर उतरायचे आहे त्याआधी जाग आली नाही तर ? अशी भिती असते. पण आता प्रवाशांनी चिंता करण्याचे कारण नाही. त्यांनी शांतचित्ताने झोप पूर्ण करावी. कारण रेल्वेने वेकअप कॉलची सुविधा सुरु केली आहे.
तुम्ही तुमच्या मोबाईलवरुन 139 हा नंबर डायल करा. तुम्हाला समोरुन काही सूचना दिल्या जातील. त्यानुसार तुम्ही तुमच्या तिकीटाचा पीएनआर नंबर टाईप करा. स्टेशनचे नाव टाका आणि झोपून जा. तुम्हाला ज्या रेल्वे स्थानकात उतरायचे आहे ते स्थानक येण्याच्या 30 मिनिटे आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अॅलर्टचा कॉल येईल.
जेणेकरुन तुमचे स्टेशन चुकणार नाही. 139 नंबरवर आवश्यक माहिती मिळाल्यानंतर सिस्टीम तुमची ट्रेन सध्या कुठे आहे ते चेक करेल. त्यानुसार स्टेशन येण्याच्या अर्धातास आधी तुम्हाला सूचित केले जाईल.