आश्चर्य! तुमचा विश्वास बसणार नाही, पण काळ्या म्हशीच्या पोटी जन्मले पांढरे रेडकू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 06:33 AM2022-12-04T06:33:00+5:302022-12-04T06:33:11+5:30
म्हशीला पिल्लू व्हावे म्हणून इंजेक्शन देण्यात आले होते.
सोलापूर : रेडकाच्या अंगावर किंवा डोक्यावर एखादं-दुसरा पांढरा ठिपका असणारे म्हशीचे रेडकू अनेक ठिकाणी आहेत, मात्र गायीच्या वासराप्रमाणेच अगदी पांढऱ्या शुभ्र रेडकाला म्हशीने जन्म दिला आहे. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील अल्पभूधारक शेतकरी राजकुमार कोटीवाले हे शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्या म्हशीने पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे.
त्वचेचा रंग हा मेलॅनिन नावाच्या पिंग्मेनमुळे काळा असतो. यामध्ये पिंग्मेनशनमध्ये जेनेटिक बदलाचा हा परिणाम आहे. म्हशीला पिल्लू व्हावे म्हणून इंजेक्शन देण्यात आले होते. म्हशीला गर्भधारणा होत असताना विशिष्ट प्रकारच्या जनुकांच्या मिश्रणामुळे अशी घटना घडू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जनुकांच्या विशिष्ट रचनेमुळे एखाद्या प्राण्यामध्ये अल्बेनिजम हा प्रकार आढळून येतो. ही एक दुर्मीळ घटना म्हणून ओळखली जाते. या प्रकारात रेडकूची प्रकृती उत्तम असते. तरीही रेडकूच्या तब्येतीकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. - प्रा. डॉ. आकाश डोईफोडे, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, सातारा