तरुणपिढीने स्वत:च्या आयुष्याकडे ‘स्वराज्य’ म्हणून पाहावे : महेश तेंडुलकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:16 PM2020-02-19T12:16:20+5:302020-02-19T12:24:32+5:30

शिवाजी महाराजांच्या विचारांचा उत्सव व्हावा 

Young generation should look at their life as 'Swarajya': Mahesh Tendulkar | तरुणपिढीने स्वत:च्या आयुष्याकडे ‘स्वराज्य’ म्हणून पाहावे : महेश तेंडुलकर 

तरुणपिढीने स्वत:च्या आयुष्याकडे ‘स्वराज्य’ म्हणून पाहावे : महेश तेंडुलकर 

googlenewsNext
ठळक मुद्देशिवजयंतीच्या निमित्ताने ‘लोकमत ’शी साधलेला संवाद इतिहासाकडे संशोधन व प्रबोधनात्मक दृष्ट्या पाहिले गेले तर बरेसचे गोंधळ होतील कमी चित्रपट, नाटक, कादंबरी हे इतिहास नाही तर मनोरंजनाचा भाग

 दीपक कुलकर्णी- 
पुणे: सध्याच्या तरुणपिढीसमोर आदर्श व्यक्तिमत्वांचा तुटवडा आहे. त्यामुळे ती दिवसरात्र फक्त यशाच्या पाठीमागे धावत आहे. त्या मार्गात थोडे यश आलेतर हुरळून जाणे आणि अपयशाने क्षणार्धात खचून जाते. त्या मानसिक धक्क्यातून सावरणे तर दूरच पण व्यसने, नैराश्य यांच्या कचाट्यात अडकत शेवटी आत्महत्येपर्यंतचा पर्याय वापरण्यापर्यंत ही मजल जाते. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंंती आपण वर्षानुवर्षे साजरी करतो.त्या शिवरायांच्या ‘ स्वराज्य’ निर्मितीच्या ध्यासाची आपल्या ध्येयाशी जोडणी केली तर बरेचसे प्रश्न, अडथळे, आव्हाने, विषमता, जातीयवाद संपतील. आणि व्यवसाय, शिक्षण, नोकरीतून सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभक्ती, विकासाकडे मार्गक्रमण करण्याची नवी दृष्टी लाभेल, असे मत प्रसिध्द इतिहास अभ्यासक महेश तेंडुलकर यांनी ‘शिवजयंती’ च्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.. 
 ‘शिवजयंती’ च्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी ‘लोकमत ’ ने साधलेला संवाद ... 

 

सध्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे आकलन झाले आहे का ?
- आजपर्यंत सिनेमा, मालिका, महानाट्य, कादंबरी यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर आले आहे. ह्या सर्व माध्यमांकडे मनोरंजनाच्या उद्देशाने पाहिले जाते. परंतु, वैचारिक , इतिहासातील पुराव्याच्या आधारे शिवाजी महाराज अजूनतरी बºयाचअंशी समजलेले नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या पध्दतीने शिवाजी महाराज मांडतो. त्यातून समाजात अनेक वाद निर्माण होतात. कदाचित इतिहासाकडे संशोधन व प्रबोधनात्मक दृष्ट्या पाहिले गेले तर नक्कीच वरेसचे गोंधळ कमी होतील.
 
इतिहासाविषयी चित्रपट, नाटक , कादंबरीत घेतले जाणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कितपत योग्य वाटते? 
-मुळात इथेच आपले गणित चुकते. नुकताच तान्हाजी चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाने महाराष्ट्राची चौकट मोडत सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सातासमुद्रापार नेली. मनोरंजनातून इतिहासाकडे बघितले तर चित्रपट अतिशय उजवा ठरतो. पण त्याला  इतिहासाच्या कसोटीवर तोलायचे झाले तर कुठेतरी काही गोष्टी, घटना खटकतात.चित्रपट, नाटक, कादंबरी हे इतिहास नाही तर मनोरंजनाचा भाग आहे. इतिहासाची ओळख ही अभ्यासातून होते. 

गड, किल्ल्यांवरती गर्दी दिसते पण ती मौजमजेसाठी की इतिहासप्रेमींची ़? 
- गड, किल्ल्यांवर होणाºया गर्दीकडे आपण सकारात्मक अंगाने पाहायला हवे. तान्हाजी चित्रपटानंतर कितीतरी अमराठी नागरिक सिंहगडावर गेले. ते समाधानकारक चित्र आहे. सध्या ते मौजमजेसाठी तिथे गेले तरी हरकत नाही. फक्त तिथल्या मातीचे पावित्र्य भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. नंतर कुतुहलापोटी ते इतिहासातील चार -दोन पुस्तके  वाचणार हे देखील तेवढेच खरे आहे. आणि त्यातूनच भविष्यात दुर्गसंवर्धनाची चळवळ उभी करत आहे.

 

सोशल मीडियावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची जपणूक होते का ? 
-सोशल मीडियाचा जनमानसावरचा प्रभाव कमालीचा आहे. तिथे मी फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही. पण प्रत्येकाने सत्यता असत्यता यांची तपासणी करुनच ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दलचे ,संदेश पुढे पाठवावे. कारण त्यातून एखादा चुकीचा मेसेज गेला तर अनेक सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची सोशल मीडियावरच नाही तर आपल्या वैयक्तिक व समाज जीवनात प्रतिमा जपण्याचा प्रयत्न कटाक्षाने केला पाहिजे.

प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचा विचार रुजण्यासाठी अजून काय प्रयत्न हवे ? 
- सरकार पातळीवर शिवाजी महाराजांचे विचार रुजण्यासाठी शिवस्मारके, शिवसृष्टी, व्याख्याने, महोत्सव अशा वेगवेगळ््या उपक्रमातून प्रयत्नशील असते. पण त्यापलीकडे जाऊन महाराजांच्या जीवनातील नेतृत्वगुण, दूरदृष्टीकोन, नियोजन, धैर्य, सकारात्मकता, तत्व, चारित्र्यसंपन्नता हे गुण वाढण्यासाठी इतिहासाच्या प्रांतात पुस्तकेवाचन, स्थळभेटी यांतून भ्रमंती केली पाहिजे. 

इतिहास अभ्यासक म्हणून करियर या संकल्पनेकडे तरुणाई कशी पाहते़ ? 
- पदवीधर होऊन शिक्षक होण्यापलीकडे इतिहासाची दखल घेतली गेली नाही. तसे इतिहासाकडे करियर म्हणून पाहण्याइतपत हा विषय उपयोगी नाही.फार फार तर इतिहास अभ्यासक होवून व्याख्याते, लेखक, गिर्यारोहक म्हणून आयुष्यात कार्यरत राहू शकतो. परदेशी भाषेत शिवचरित्र पोहचवण्यासाठी इतर भाषांचा अभ्यास करुन प्रयत्न करणे तितकेच गरजेचे आहे. 

 

 

Web Title: Young generation should look at their life as 'Swarajya': Mahesh Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.