इंडस्ट्रीयल संस्थेविरूध्द उपोषणास बसविले म्हणून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 03:11 PM2017-02-22T15:11:48+5:302017-02-22T16:10:14+5:30

उदगीर येथील सिद्धार्थ इंडस्ट्रीयल को-आॅपरेटीव्ह संस्थेतील गैरप्रकाराविरुद्ध महिलांना उपोषणास बसविल्याचा राग मनात धरुन..

The young man's blood has been sacked as a protest against the industrial institution | इंडस्ट्रीयल संस्थेविरूध्द उपोषणास बसविले म्हणून युवकाचा खून

इंडस्ट्रीयल संस्थेविरूध्द उपोषणास बसविले म्हणून युवकाचा खून

Next

ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. 22 : उदगीर येथील सिद्धार्थ इंडस्ट्रीयल को-आॅपरेटीव्ह संस्थेतील गैरप्रकाराविरुद्ध महिलांना उपोषणास बसविल्याचा राग मनात धरुन संस्थेच्या पदाधिकाऱ्याने उदगीरमधील एका युवकाचा अपहरण करुन खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे़ याप्रकरणी चार संशयितांना शहर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले आहे़. 

उदगीरच्या सिद्धार्थ इंडस्ट्रीयल को-आॅपरेटीव्ह संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत त्याची चौकशी करुन गुन्हे नोंदविण्याच्या मागणीसाठी सविता बिरादार व अन्य काही महिला उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसल्या होत्या़ त्यांना उदगीरच्या फले नगरातील विजय बळीराम मसुरे (वय ३५) या युवकानेच उपोषणास बसविल्याचा संशय संस्थेचा पदाधिकारी शिवकुमार झटिंग कांबळे  याच्या मनात होता़ त्यातूनच बुधवारी रात्री १०़१५ वाजण्याच्या सुमारास त्याने त्याच्या अन्य चार साथीदारांमार्फत विजयचे अपहरण करुन त्याचा शहरापासून ६ किमी अंतरावरील तिवटग्याळ पाटी येथे दगडाने ठेचून खून करण्यात आला़ त्यानंतर मृतदेह तेथेच टाकून मारेकरी पसार झाले़ ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांना कळाली़ तेथून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला़.

याप्रकरणी मयत विजय मसुरे यांच्या पत्नी अनिता मसुरे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी शिवकुमार झटिंग कांबळे, झटिंग शंकर कांबळे, शांताबाई झटिंग कांबळे, महादेवी वसंत बोडके, अविनाश वाघमारे व अन्य अनोळखी चार जणांविरुद्ध कलम ३६४, ३०२, १२० ब अन्वये शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय अधिकारी अनिकेत भारती, पोनि़ भीमाशंकर हिरमुखे, राजकुमार सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून तपास गती दिली आहे़ आतापर्यंत झटिंग शंकर कांबळे, शांताबाई झटिंग कांबळे, महादेवी वसंत बोडके, अविनाश वाघमारे या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे़ मुख्य आरोपी शिवकुमार कांबळे फरार आहे़  दरम्यान, मुख्य आरोपीस अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता़ त्यांची पोलिसांकडून समजूत काढण्यात आली़ 

आधी अपहरणाचा मग खुनाचा गुन्हा़
याप्रकरणात सुरुवातीला विजय मसुरे यांचे मित्र अविनाश वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़ विजय व अविनाश हे दोघे शहरातील विद्या वर्धिनी शाळेजवळ बसलेले असताना एका कारमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी विजयला मारहाण करीत अपहरण केले़ दरम्यान, मध्यरात्री मृतदेह आढळल्यानंतर याप्रकरणात अनिता मसुरे यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ विशेष म्हणजे या गुन्ह्यात अपहरण प्रकरणात फिर्यादी असलेला अविनाश वाघमारे याला आरोपी करण्यात आले आहे़

२ कार व काठ्या जप्त़़
घटनेनंतर मारेकऱ्यांनी त्यांची एमएच २४ सी ६८०६ क्रमांकाची कार घटनास्थळीच सोडून पोबारा केला़ तपासात हा क्रमांक अन्य वाहनाचा असल्याचे समोर येत आहे़ तसेच लातूर येथून मुख्य आरोपी शिवकुमार कांबळे यांची एमएच २४ व्ही ६८१७ क्रमांकांची कार स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतली आहे़ त्यात रक्त लागलेल्या काठ्या मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले़

आठवडाभरात त्याचा तिसरा गुन्हा़
 सिद्धार्थ इंडस्ट्रीयल संस्थेच्या विरोधात उपोषणास बसलेल्या सविता बिरादार व अन्य महिलांना रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मागच्या गुरुवारीच शिवकुमार कांबळेवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ अन्वये शहर पोलिसांत गुन्हा नोंद आहे़ त्यापाठोपाठ उपोषकर्त्या महिलेपैकी एकीने दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारीच ग्रामीण पोलिसांत कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा शिवकुमारवर नोंदविला गेला आहे़ त्यानंतर आता हा खुनाचा तिसरा गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला़ 

Web Title: The young man's blood has been sacked as a protest against the industrial institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.