यंग प्रभादेवीची आगेकूच!

By Admin | Published: April 20, 2016 05:29 AM2016-04-20T05:29:20+5:302016-04-20T05:29:20+5:30

यंग प्रभादेवी आणि एचजीएस या संघांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या प्रथमश्रेणी ‘अ’ गटात विजयी कूच कायम राखली.

Young Prabhadevi ahead! | यंग प्रभादेवीची आगेकूच!

यंग प्रभादेवीची आगेकूच!

googlenewsNext

मुंबई : यंग प्रभादेवी आणि एचजीएस या संघांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या प्रथमश्रेणी ‘अ’ गटात विजयी कूच कायम राखली. दुसरीकडे ‘ब’ गटात प्रॉमिस स्पोटर््स क्लबने नवमित्र क्रीडा मंडळाला नमवले, तर प्रभादेवीच्या विकास संघाचे आव्हान संपुष्टात आले.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि विजय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने दादर येथील दत्ता राऊळ मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेत अतुल गावकरच्या आक्रमक चढाया आणि प्रमोद नेसरकर, विशाल चिंदरकर यांच्या दमदार पकडीच्या जोरावर यंग प्रभादेवी संघाने ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टचा ३०-९ असा सहज फडशा पाडला.
यानंतर झालेल्या अटीतटीच्या लढतीत एचजीएस क्रीडा मंडळाने सुनील स्पोटर््स क्लबचे आव्हान ३८-३५ असे परतावून आगेकूच केली. मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना एचजीएसने निर्णायक गुणांची कमाई करताना बाजी मारली. ओंकार जाधव, प्रमोद पवार आणि चंदन सिंग यांनी उत्कृष्ट खेळ करताना एचजीएसच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तर रोहन जाधव, सागर गुप्ता व चेतन गावकर यांनी पराभूत संघाकडून अपयशी झुंज दिली. स्पर्धेच्या ‘ब’ गटात दादरच्या प्रॉमिस संघाने विजयी घोडदौड कायम राखताना नवमित्र क्रीडा मंडळाचा ३३-१२ असा पाडाव केला. मध्यंतरालाच प्रॉमिस संघाने १३-४ अशी एकतर्फी आघाडी घेत चित्र स्पष्ट केले होते. हेमंत बांदकर, तुषार आडीवडेकर आणि भारत ताम्हणकर यांनी आक्रमक चढाई व दमदार पकडींचे प्रदर्शन करताना प्रॉमिस संघाच्या विजयावर शिक्का मारला.

Web Title: Young Prabhadevi ahead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.