यंगिस्तान जिंदाबाद : टक्का कमी, पण दावेदारी दमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 05:33 AM2019-10-19T05:33:51+5:302019-10-19T05:33:56+5:30

आखाड्यातील युवकांनी लक्ष वेधले

Youngistan Zindabad: Decent low, but strong at stake | यंगिस्तान जिंदाबाद : टक्का कमी, पण दावेदारी दमदार

यंगिस्तान जिंदाबाद : टक्का कमी, पण दावेदारी दमदार

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या युवकांनी आपल्या दमदार इन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राजकीय धारेतील प्रमुख पक्षांनी नव्या चेहऱ्यांना, युवकांना उमेदवारी देताना हात आखडते घेतले असले तरी, काही युवकांनी त्याची पर्वा न करता निवडणुकीच्या रिंगणात स्वत:ला झोकून दिले आहे.


विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३ हजार ३३३ उमेदवार असून पैकी वयाच्या चाळीशीत असलेल्या युवकांची संख्या १३४ एवढी आहे. त्यातही मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी युवकांना झुकते माप दिले नसले तरी जे युवक रिंगणात आहेत ते राजकारणातील चुणुक दाखवणारे ठरणार आहेत. विद्यार्थीदशेतच राजकारणाचे धडे घेतलेले अन् समाजमनाबद्दल संवेदनशील असलेले काही तरुण राजकारणात आपले पाय रोवू लागले आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते आपले भवितव्य अजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.


लोकसभा निवडणुकीत जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल (गुजरात) व कन्हैय्याकुमार (बागलाण) या युवकांनी भारतीय राजकारणावर चांगलीच छाप पाडली असून त्यांच्याच पावलावर पाऊल तरुण उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
राजकीय पार्श्वभूमी असलेले अन् प्रस्थापित पक्षातून निवडणूक रिंगणात उतरलेले शिवसेनेचे आदित्य ठाकरे, काँग्रेसचे झीशान बाबा सिद्दीकी व शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख हे तीन उमेदवार वगळता तिशीच्या आतील एकाही नवख्या युवकाला राजकीय पक्षाने उमेदवारी दिलेली नाही.
राष्टÑवादीतून मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्यानंतर युवकांच्या जोरावर सत्तेकडे जाण्याची भाषा करणाºया शरद पवार यांनी रोहित पवार (जामखेड), ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण), इंद्रनील नाईक (यवतमाळ), दिलीप डांगे (लोहा), आदिती तटकरे (श्रीवर्धन), आणि सुनील भुसारा (विक्रमगड) या तरूणांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेनेकडून आदित्य ठाकरे (वरळी), श्रीनिवास वानगा (पालघर) गौरव नाईकवडी (इस्लामपूर), समीर देशमुख (देवळी) व रश्मी बागल (करमाळा) हे तरुण उमेदवार आहेत. राज्यात १४५ जागा लढवणाºया भाजपने नमिता मुंदडा (केज), सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट) नितेश राणे (कणकवली) आणि राम सातपुते (माळशिरस), प्रताप अडसड (धामणगाव रे.) यांना प्रथमच उमेदवारी दिली आहे. यापैकी राजकीय पार्श्वभूमी नसलेले सचिन कल्याणशेट्टी व राम सातपुते हे आहेत. राम सातपुते हे एक उसतोड मजुराचे पुत्र असून त्यांच्या विरोधात साखर कारखानदार आहे.
अक्कलकोटमध्येही दोन आमदार तिकिटासाठी इच्छुक असताना भाजपने सचिन कल्याणशेट्टी या नवख्या आणि धडाडीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दिलेल्या उमेदवारीमध्ये झीशान बाबा सिद्दीकी (वांद्रे पूर्व ) हे सर्वात तरुण उमेदवार आहेत. याशिवाय अरविंद मोंडकर (कुडाळ), अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर (अलिबाग), धीरज देशमुख, अमित देशमुख, प्रणिती शिंदे (सोलापूर), आणि रोहित साळवे (अंबरनाथ) या तरुणांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. सिद्दीकी आणि सांगोल्याचे शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख हे दोघेही २७ व्या वर्षी निवडणुकीत उतरले आहेत. देशमुख यांना माजी आमदार गणपतराव देशमुख यांची मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे.
स्वतंत्रपणे कौल मागणारे युवक

या चार प्रमुख पक्षाव्यतिरिक्त काही तरुण आपल्या विचारांना वाट मोकळी करत जनतेकडून कौल अजमावत आहेत. त्यामध्ये वंचितकडून मुलुंडमधून शशीकांत मोकळ आणि विक्रोळीमधून सिध्दार्थ मोकळे, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी(भायखळ) पेणमधून नंदा म्हात्रे, यवतमाळमधून बिपीन चौधरी, शिराळ्यातून सम्राट महाडिक, डॉ. अशिष तांबे (कल्याण), कॉ. सरिता खंदारे (परतूर), अ‍ॅड. लालसू नागोटी (अहेरी), डॉ. अभिजित मोरे (कोथरूड) हे युवक मतदाराना साद घालत आहेत. कसलेही आर्थिक पाठबळ नसलेले परमेश्वर जाधव, कॉ. सरिता खंदारे हे युवक केवळ आणि केवळ आपल्या जनमानसातील प्रतिमेवर निवडणुकीत उभे आहेत. मूळचा लातूरचा असलेल्या परमेश्वर जाधवने राज्यशास्त्रात पीएचडी केली असून कामगार व वंचित घटकांच्या समस्यांचा पोटतिडकीने अभ्यास केला आहे.


भारतीय क्रातीकारी कामगार पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत. डाव्या विचाराच्या अन् स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या माध्यमातून विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत राहणाºया कॉ. खंदारे यांच्यामागे मोठा लवाजमा नसला तरी त्या घरोघरी आणि शेताशिवारात जाऊन मतदारांची भेट घेत आहेत. नक्षलवादाने होरपळलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अ‍ॅड लालसू नागोटी यांनी नवा आशावाद निर्माण केलाय. पुण्यात वकिलीचे शिक्षण पूर्ण करुन गावी गेला. २०१७ च्या जि.प. निवडणुकीत विजयी झालेल्या लालसूला वंचितने पुरस्कृत केले आहे.

बडनेरामधून युवा स्वाभिमान पार्टीचे रवी राणा, धामणगाव ( रे.)मधून वंचितचे निलेश विश्वकर्मा आणि मोर्शीमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार हे उमेदवार आहेत. मुकेश पेंदाम (रामटेक) शुभम बावनगडे (कामठी), नाशिम आलम (हिंगणा), संचयता पाटील (सावनेर-बसपा) मनिष देवराव पुसाटे (आर्वी-बसपा) राजेश चंपत सावरकर(देवळी -प्रहार) राहूल परसांजी तायडे (देवळी-बमुपा), डॉ. संदीप तांबारे (उस्मानाबाद- संभाजी ब्रिगेड), क्षितीज ठाकूर (नालासोपारा- बहुजन विकास आघाडी), संतोष जनाठे (भोईसर- अपक्ष) हे तरुण उमेदवार आहेत.

विधानसभेत सशक्त विरोधी पक्षाची अपेक्षा ठेवणाºया महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने अविनाश जाधव (ठाणे शहर), संदीप पाचंगे (ओवळा माजीवडा), शुभांगी गवारी (भिवंडी ग्रामीण),सुमेध भवार( अंबरनाथ), महेश कदम (कोपरी पाचपाखाडी), हरेश सुतार (मीरा-भार्इंदर) या तरुणांना उमेदवारी दिली आहे.

Web Title: Youngistan Zindabad: Decent low, but strong at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.