आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल; जरांगे पाटलांचे भुजबळांना जशास तसे प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 06:25 PM2023-11-26T18:25:09+5:302023-11-26T18:25:50+5:30
शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीवर त्यांना वाटतेय आपली तर दहशत आहे. असो वयोमानानुनार होत असते. त्यांचे केस पांढरे होऊन काय फायदा झाला. - जरांगे पाटील
हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेमध्ये छगन भुजबळ यांनी शिंदे समिती रद्द करण्याची मोठी मागणी केली, तसेच गेल्या दोन महिन्यांत देण्याची आलेली कुणबी प्रमाणपत्रे देखील रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली होती. यावर आजा जरांगे पाटलांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीवर त्यांना वाटतेय आपली तर दहशत आहे. असो वयोमानानुनार होत असते. त्यांचे केस पांढरे होऊन काय फायदा झाला. कायद्याच्या पदावर बसायचे आणि असली भाषा बोलायची. त्यांना चांगले माहीत आहे त्यांनी काय काय खुंट्या ठोकून ठेवल्यात त्या, आता आम्हीही खुंट्या तयार ठेवल्या आहेत, असा इशारा पाटलांनी दिला आहे.
जोडायला अक्कल लागते हे आधीच त्यांना कळायला हवे होते. मराठ्यांनी त्यांना उंचीवर नेऊन ठेवले, हे त्यांना कळायला हवे होते. गावबंदी हटाववरून त्यांना पदाचा गैरवापर करायचा आहे का असा सवाल करत लोक गावात येऊ नका हे हक्काने सांगतायत. यांना हक्क कळतो का, असा सवाल भुजबळ यांना केला. तसेच तुम्ही अटक का केली याच कारण सांगा. आमच्या लोकांचं काय चुकलं? तुम्हाला काय बोलावे हेच कळत नाहीय. समाज मला काय कुणालाही पडताळून बघू शकत नाही. महाराष्ट्रातील मराठा समाज आमचा नाही हे मी म्हणू शकत नाही. फक्त मराठा आरक्षणाचा कायदा सांगा दुसरे सांगू नका, असे जरांगे पाटील म्हणाले.
आमच्या लोकांनी मार खाल्ला. पोलिसांनी त्यांना गोळ्या मारल्या. यांचे केस असेच पांढरे झालेत का, तुम्ही असेच पांढरे झाले का? जाती जातीत द्वेष पसरवतायत असा आरोप करत जरांगे पाटलांनी शिव्या देणाऱ्या लोकांचं मी समर्थन करत नाही कुणी त्यांच्या अंगावर जाऊ नये, असा सल्ला दिला. तसेच यांना कुठे झुंडशाही दिसली. त्यांचेच पाहुणे आहेत हॉटेल जाळणारे पण हे लोकांवर ढकलतात असा आरोप जरांगे यांनी केला.
आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल, कारण ओबीसींच्या शासकीय नोंदी नाहीत. तुम्ही ओबीसी आणि मागास नाही, आम्हाला कुणीही बाहेर काढू शकत नाही. मी दिवस रात्र सांगतोय, ओबीसी मराठा यांनी एकमेकांच्या अंगावर जायचे नाही. बोर्ड काढा हे त्यांचे आवाहन जातीयवादी नाही तर काय आहे. मी पाय तोडून घ्यायला तयार, पण आरक्षण मिळवूनच दाखवणार आहे. या सभेला त्यांनी दंगल सभा नाव द्यायला हवे. ते पांढरे झाले जुनाट नेते आहेत, असा टोला जरांगे पाटलांनी तायवाडे यांना लगावला.
मी आता त्यांना संताजी धनाजीसारखा दिसत आहे. कितीही दंगली भडकवण्याचा प्रयत्न करूद्या. मराठ्यांनी शांतपणे आंदोलन करावे. जुन्या नेत्यांना मी सल्ले देत नाही. खोट्या केसेसचा त्रास सहन करा, पण शांत बसा. शांतपणे सहन करा, एकजूट वाढवा, आपण आरक्षण घेऊच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.