तुमच्या सरकारने बातमी खरी मानली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2016 04:15 AM2016-09-12T04:15:58+5:302016-09-12T04:15:58+5:30

टीव्हीवर येणारी प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही खरी नसते आणि तशी ती खोटीही नसते. तथापि, तुमच्या (!) सरकारने मात्र माझ्याबाबतीत आलेली प्रत्येक न्यूज खरी मानली

Your government accepted the news! | तुमच्या सरकारने बातमी खरी मानली!

तुमच्या सरकारने बातमी खरी मानली!

Next

फैजपूर (जळगाव) : टीव्हीवर येणारी प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही खरी नसते आणि तशी ती खोटीही नसते. तथापि, तुमच्या (!) सरकारने मात्र माझ्याबाबतीत आलेली प्रत्येक न्यूज खरी मानली आणि आपली ४० वर्षांची तपस्या क्षणात संपली, अशी खंत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या समोर व्यक्त केली.
मंत्रिपद गेल्यामुळे एक प्रकारे राजकीय विजनवासात असलेले माजी मंत्री खडसे संधी मिळेल, तेव्हा सरकारला टार्गेट करत आहेत. वाढदिवसानिमित्त जळगावात झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी स्वपक्षाच्या सरकारला चार खडे बोल सुनावले होते. तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना, ‘मी मागच्या बाकावर बसलो, तर अनेकांची अडचण होईल,’ असा गर्भीत इशारा दिला होता.
फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाचे रविवारी शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तावडे यांनी ‘टीव्हीवर येणारी प्रत्येक ब्रेकिंग न्यूज खरी नसते आणि तशी ती खोटीसुद्धा नसते,’ असे सांगितले होते. त्याचाच धागा पकडत खडसे यांनी आपल्या भाषणादरम्यान तावडे यांच्याकडे कटाक्ष टाकत, माझ्या बाबतीत तुमच्या सरकारने मात्र प्रत्येक ब्रेकिंग न्यूज खरी मानली़, असे उद्गार काढले. 

Web Title: Your government accepted the news!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.