आपले सरकार पोर्टल आता संपूर्ण राज्यासाठी
By admin | Published: January 26, 2016 03:08 AM2016-01-26T03:08:49+5:302016-01-26T03:08:49+5:30
सर्वसामान्य नागरिकांच्या मंत्रालय स्तरावरील प्रशासकीय तक्रारींचे निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी २६ जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलची सेवा उद्यापासून राज्यभर दिली जाणार
मुंबई : सर्वसामान्य नागरिकांच्या मंत्रालय स्तरावरील प्रशासकीय तक्रारींचे निवारण करण्यासाठी गेल्या वर्षी २६ जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलची सेवा उद्यापासून राज्यभर दिली जाणार आहे. या पोर्टलद्वारे आधी ६ जिल्ह्यांसाठी तक्र ार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली होती. (विशेष प्रतिनिधी) राज्यातील नागरिकांना संबंधित विभागाकडे तक्र ारी करणे सुलभ होणार असून, तक्र ार दाखल करण्याविषयी माहिती, त्यावरील कार्यवाही, लागणारा कालावधी आदी माहितीही या पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे. या यंत्रणेत नागरिकांकडून दाखल झालेल्या तक्र ारींच्या कार्यवाहीचा पाठपुरावा मुख्यमंत्री कार्यालय करेल.
लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध विभागांच्या २५२ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४७ सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. २६ जानेवारीपासून १५० हून अधिक सेवा आॅनलाइन करण्यात येणार आहेत.
वेब पोर्टलवर तक्र ार दाखल करताना जिल्हा, विषय, तक्र ारीचे स्वरूप, संबंधित विभाग, प्रशासन प्रकार आदी माहिती दिल्यानंतर नागरिकांना तक्र ारीसोबत कागदपत्रेही जोडता येतील. तक्र ारदाराचा ई-मेल आयडी आणि मोबाइल क्र मांक आवश्यक आहे. तक्र ार दाखल करण्यासाठी वनटाइम पासवर्ड मिळेल, तसेच तक्र ारीनंतर मिळणाऱ्या टोकन आयडीचा वापर करून मागोवा घेता येईल.