आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 02:17 PM2020-07-27T14:17:52+5:302020-07-27T14:38:08+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यंदा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या जात आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो", असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे. तसेच, नरेंद्र मोदींनी दिलेल्या या शुभेच्छांसाठी उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केले आहे.
Best wishes to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray Ji on his birthday. I pray for Uddhav Ji’s long and healthy life. https://twitter.com/OfficeofUT?ref_src=twsrc%5Etfw">@OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) https://twitter.com/narendramodi/status/1287600310689525760?ref_src=tws…">July 27, 2020
उद्धव ठाकरेंनी ट्विट करून आभार मानले आहेत. "माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील काळात देशाच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान असावे यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील याचा पूर्ण विश्वास वाटतो", असे ट्विट उद्धव ठाकरेंनी केले आहे.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील काळात देशाच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान असावे यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील याचा पूर्ण विश्वास वाटतो https://t.co/gz5tWReBCv">pic.twitter.com/gz5tWReBCv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) https://twitter.com/CMOMaharashtra/status/1287625126100340737?ref_src=t…">July 27, 2020
याशिवाय, नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पत्रही पाठवले आहे. त्यामध्ये "वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे" असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यालय किंवा मातोश्री या निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नका. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करु नका आणि फलक लावू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
आणखी बातम्या...
'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी