आपला पाळीव पोऊ
By admin | Published: June 27, 2015 01:55 AM2015-06-27T01:55:17+5:302015-06-27T01:55:17+5:30
आपल्यापैकी अनेकांना एखादा छानसा गुबगुबीत कुत्रा, मस्तीखोर मांजर किंवा इतर आवडते प्राणी पाळायची इच्छा नक्कीच असते. पण नेमके आपले आई-बाबा मध्ये येतात
तुषार भामरे -
आपल्यापैकी अनेकांना एखादा छानसा गुबगुबीत कुत्रा, मस्तीखोर मांजर किंवा इतर आवडते प्राणी पाळायची इच्छा नक्कीच असते. पण नेमके आपले आई-बाबा मध्ये येतात अन् आपली इच्छा अपूर्ण राहते. दोस्तांनो, तुमचंही असंच होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही तुमचा हक्काचा पाळीव प्राणी पाळू शकता आणि तोही एलियन... त्याला खाऊ-पिऊ घालू शकता, त्याच्यासोबत खेळू शकता. 'पोऊ’ नावाचा हा एलियन प्राणी तुम्ही तुमच्या अॅण्ड्रॉइड मोबाइलवर गेमच्या रूपात डाऊनलोड करू शकता. ज्याप्रमाणे एखाद्या पाळीव प्राण्याला भूक लागते, त्याची काळजी घ्यावी लागते त्याप्रमाणेच तुम्ही पोऊला भरवू शकता आणि त्याची वाढ होताना पाहू शकता. आहे की नाही मज्जा? या पोऊसोबत गेम रूममध्ये वेगवेगळे गेम्स खेळून कॉइन्सही गोळा करू शकता. हे कॉइन्स तुम्हाला पोऊसाठी विविध कपडे, अॅक्सेसरीज, औषधे, खाऊ घेण्यासाठी वापरता येतात. येथे वेगवेगळे आऊटफिट्स, हॅट्स, सनग्लासेसही तुम्हाला घेता येतील. वॉलपेपर्स, त्याला मिळालेल्या बक्षिसांनी तुम्ही पोऊच्या राहत्या घराला सजवू शकता. थोडक्यात काय तर तुम्हाला तुमच्या खरोखरच्या पाळीव प्राण्यापेक्षा जास्त हौसमौज या पोऊसोबत करता येईल. याचबरोबर तुमच्या आवाजाची नक्कल करेल. तसेच वाय-फाय, इंटरनेट किंवा ब्लूटुथने कनेक्ट केल्यावर तुमच्या मित्रांच्या पोऊसोबतही तुम्ही धमाल करू शकता.