आता घर बसल्या करता येणार आपल्या मिळकतीचे मूल्यांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 11:30 PM2019-12-30T23:30:00+5:302019-12-31T14:24:25+5:30

दररोज राज्यातील तब्बल ५० ते ६० हजार नागरिकांना होणार फायदा

Your property income can received by online process very easy | आता घर बसल्या करता येणार आपल्या मिळकतीचे मूल्यांकन

आता घर बसल्या करता येणार आपल्या मिळकतीचे मूल्यांकन

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन वर्षांत १ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात प्रणालीची अंमलबजावणीनोंदणी व मुद्रांक विभागाचा कारभार पारदर्शक करणे हाच उद्देशराज्यात दररोज तब्बल ११ हजार पेक्षा अधिक विविध प्रकारच्या मिळकतीची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने ‘ई- व्हेल्युएशन’प्रणालीद्वारे नागरिकांना मिळकतीचे बाजारमूल्य कळणार

सुषमा नेहरकर-शिंदे 
पुणे : नागरिकांना कोणतीही मालमत्ता, मिळकतीची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निंबधक कार्यालयांमध्ये जाऊन आपल्या प्रॉपर्टीचे मूल्यांकन करण्याची आता गरज नाही. येत्या नवीन वर्षात नलाईन पध्दतीने ‘ई- व्हेल्युएशन’प्रणालीद्वारे नागरिकांना घर बसल्या आपल्या मिळकतीचे बाजारमूल्य कळणार आहे. यामुळे दुय्यम निंबधक कार्यालयामध्ये नागरिकांना घालावे लागणारे हेलपाटे व चुकीच्या पध्दतीच्या मूल्यांकनाला आळा बसणार आहे.
    राज्यात दररोज तब्बल ११ हजार पेक्षा अधिक विविध प्रकारच्या मिळकतीची नोंदणी होते. यामुळे किमान ५० ते ६० हजार पेक्षा अधिक लोकांना दररोज विविध कारणासाठी आपल्या मिळकतीचे मूल्यांकन करावे लागते. यासाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन संबंधित अधिकारी अथवा कर्मचा-यांकडून मिळकतीचे मुल्यांकन करुन घ्यावे लागते. यामध्ये अनेक वेळा संबंधित अधिकारी, कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार नियम,कायद्यांचे अर्थ लावून वेगवेगळ््या पध्दतीने व सोयीनुसार मुल्यांकन करुन देतात. यामध्ये सर्वसमान्य नागरिकांना यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात, तर अनेकवेळा अर्थिक व्यावहार देखील करावे लागतात. या सर्व प्रकारामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मात्र पिळवणूक होते. यामुळेच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाच्या वतीने मिळकतीचे बाजारमुल्य ठरविण्यासाठी नलाईन ‘ई- व्हेल्युएशन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 
    दस्त नोंदणी कारण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने दरवर्षी मुद्रांक शुल्क आकारणीसाठी वार्षिक मुल्यदर तक्ते व सविस्तर मूल्यांकनासाठी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या जातात. मुल्यांकनासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना तांत्रिक स्वरुपांच्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांना यासाठी दुय्यम निबंधक अथवा अन्य नोंदणी कार्यालयांकडे संपर्क करावा लागतो. नागरिकांना बाजारमुल्य करुन देण्यासाठी बहुतेक दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये एजन्टगिरी सुरु असून, हे एजन्ट देखील नागरिकांची पिळवणूक करतात.या सर्व प्रकारामध्ये पादर्शकता आणण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाच्या वतीने आयजीआर फीसच्या संकेतस्थळावर नलाईन सर्व्हिसेस या शिर्षाखाली ‘ई-मूल्यांकन’ लिंक दिली आहे. या लिंकवर जाऊन नागरिकांना आता घरी बसून आपल्या मिळकतीची सर्व माहिती या प्रणालीमध्ये भरल्यानंतर सध्याचे बाजार मुल्यांकन कळणार आहे.
--------------------
नोंदणी व मुद्रांक विभागाचा कारभार पारदर्शक करणे हाच उद्देश
राज्यात शासनाच्या सर्व विभागांमध्ये नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना नलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देणे व नोंदणी व मुद्रांक शुल्कांमध्ये पादर्शकता आणणे यासाठीच येत्या नवीन वर्षांत ‘ई-मूल्यांकन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना घर बसल्या आपल्या मिळकतीचे बाजारमूल्य समजणार आहे. तसेच मिळकतीनुसार बाजलमुल्यांमध्ये एकसमानता येण्यासही मदत होणार आहे.
- अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

Web Title: Your property income can received by online process very easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.