तुमचा सेल्फी आता पोस्टाच्या तिकिटावर
By admin | Published: August 10, 2016 05:41 PM2016-08-10T17:41:25+5:302016-08-10T17:46:33+5:30
आतापर्यंत फक्त महान लोकांचे फोटो आपण पोस्टाच्या तिकिटावर पाहिले आहेत. पण आता तुम्हीही तुमचा फोटो पोस्टाच्या तिकिटार छापू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ ३००
Next
>- हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. 10 - आतापर्यंत फक्त महान लोकांचे फोटो आपण पोस्टाच्या तिकिटावर पाहिले आहेत. पण आता तुम्हीही तुमचा फोटो पोस्टाच्या तिकिटार छापू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ ३०० रुपये मोजावे लागणार असून बुलडाण्यात 'माय स्टँप' नावाची ही योजना सुरू झाली.
माय स्टँप नावाची ही योजना देशभर राबवण्याचा निर्णय टपाल खात्याने घेतला आहे. नागपूर शहरापासून या योजनेची सुरवात झाली असून बुलडाण्यात मुख्य डाकघर तसेच चौतन्यवाडी डाक घर येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला पोस्टात एक छापील फार्म भरावा लागेल. सोबत ३०० रुपये आणि तुमचा एक फोटो द्यावा लागेल. तुम्ही जर फोटो सोबत आणला नसेल तर संबधित विभाग तुमचा फोटो काढेल. १० मिनिटांत तुम्हाला तुमचा फोटो असणारी १२ तिकिटे मिळतील. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत देशात कुठेही टपाल पाठवण्यासाठी हे तिकिट तुम्ही वापरु शकता. याचबरोबर तुम्ही संस्था, इमारत, लोगो, पाळीव प्राणी, पक्षी यांचाही फोटो छापू शकता येणार आहे. पोस्टाच्या तिकीटाचे डेफीनेटीव्ह आणि स्मारक असे दोन प्रकार आहेत. डेफीनेटीव्ह तिकीट हे दैनंदिन वापरात येतात तर स्मारक तिकट हे एखादी व्यक्ती, संस्था, घटना, विषय, वनस्पती यांच्या स्मृतीत बनवले जाते. डॉ . महर्षि धोंडो केशव कर्वे, डॉ. विश्वेश्वरैया, मदर तेरेसा व क्रिकेटर सचिन तेंडूलकर या काही महान व्यक्ती आहेत. ज्यांचे जिवंतपणी फोटो पोस्ट तिकीटावर छापले गेले आहेत.
बुलडाणेकरांसाठी विशेष सुट...
माय स्टँप योजनेअंतर्गंत बुलडाण्यातील ग्राहकांसाठी विशेष सुट देण्यात आली आहे. ३०० रूपयात माय स्टॅपची सिट सोबत ५ रूपयाचे १२ स्टॅप मोफत मिळणार आहेत. याशिवाय जास्त प्रमाणात माय स्टॅप बनवणाºयांसाठी फीमध्ये विशेष सुट देण्यात आली आहे. तयात १०० सिट घेतल्यास १० टक्के व १०० पेक्षा जास्त सिट घेतल्यास २० टक्के सुट देण्यात येणार आहे. यासाठी बुलडाणा प्रधान डाकघर येथे पोस्ट मास्तर किंवा सचिन गारडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.