मुंबई विद्यापीठावर युवा सेनेचा ङोंडा
By admin | Published: June 8, 2014 01:11 AM2014-06-08T01:11:23+5:302014-06-08T01:11:23+5:30
मुंबई विद्यापीठाच्या गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवर युवा सेनेने ङोंडा फडकविला आहे.
Next
>मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेवर युवा सेनेने ङोंडा फडकविला आहे. या जागा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विद्यापीठाच्या स्थायी समिती सदस्यांशी संपर्क साधला होता. हा संपर्क मोडून काढत युवा सेनेचे सिनेट सदस्य महादेव जगताप यांची व्यवस्थापन परिषदेवर एकमताने निवड झाली. तसेच अधिसभा सदस्य म्हणून सुप्रिया करंडे यांची नियुक्ती केली आहे.
युवा सेनेचे दिलीप करंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेची जागा रिक्त होती. तर प्राध्यापक गटातील मधू परांजपे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचेही पद रिक्त होते. या जागा भरण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी संघटना विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकत होत्या. या जागा निवड प्रक्रियेमार्फत भरण्यात येणार असल्याने स्थायी समितीमधील सदस्यांना राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या पदाधिका:यांच्या निवडीसाठी संपर्क साधला होता.
शनिवारी सकाळी विद्यापीठाच्या स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेवर महादेव जगताप, तर अभिसभा सदस्य म्हणून सुप्रिया करंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच प्राध्यापक गटातून व्यवस्थापन परिषदेवर आरती प्रसाद यांच्यासह 11 सदस्यांची विविध शाखांच्या सदस्यपदी निवड केली. (प्रतिनिधी)