Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या; मराठवाड्यात दिवसभरातील दुसरी घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 06:31 PM2018-07-31T18:31:08+5:302018-07-31T20:27:30+5:30

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील वदोडबजार येथे प्रदीप हरिदास म्हस्के या १६ वर्षीय युवकाने आज सकाळी विहीरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले.

Youth commits suicide in Aurangabad for Maratha reservation; Second event in Marathwada | Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या; मराठवाड्यात दिवसभरातील दुसरी घटना 

Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या; मराठवाड्यात दिवसभरातील दुसरी घटना 

googlenewsNext

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील वदोडबजार येथे प्रदीप हरिदास म्हस्के या १६ वर्षीय युवकाने आज सकाळी विहीरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद-जळगाव महामार्ग रास्ता रोको सुरू केला आहे. मराठा आरक्षण आज बीडनंतर मराठवाड्यातील ही दुसरी घटना आहे.

प्रदीप हा नुकताच दहावीत ७५ % गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता.  त्याने आयटीआयसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र त्याला प्रवेश मिळाला नव्हता. सोमवारी झालेल्या तिसर्‍या फेरीत ही त्याचा नंबर न लागल्याने तो निराश झाला होता. त्यातच स्थानिक महाविद्यालयात विज्ञात शाखेत प्रवेशासाठी त्याला पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. प्रवेशासाठी त्याने पालकांसमवेत चकरा मारल्या. परंतु, पैसे दिल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही असे महाविद्यालयातून सांगण्यात आल्याने तो पूर्णपणे खचला होता. 

आयटीआयमध्ये प्रवेश न मिळाल्याने प्रदीपने सोमवारी रात्री वडिलांना माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांस आरक्षणामुळे प्रवेश मिळाला पण मला मिळाला नाही असे सांगितले. यानंतर आज सकाळी तो घराबाहेर पडला असता दुपारपर्यंत तो घरी न आल्याने पालकांनी त्याचा शोध सुरु केला. यावेळी महालकिन्होळा शिवारातील रामदास सोमदे यांच्या शेतातील विहिरीजवळ त्याची चप्पल व सायकल आढळून आली. विहिरीत पाहिले असता ग्रामस्थांना त्याचे प्रेत आढळून आले. 

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण नसल्यानेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असे म्हणत नातेवाईकांसह मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रदिपचे प्रेत वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर कुटुंबीयांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यानी अचानक रस्त्यावर उतरून औरंगाबाद-जळगाव राज्यमार्गावरील फरशी फाटा येथे रास्तारोको आंदोलन सुरु केले. यामुळे या ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे. आंदोलकांनी प्रदीपच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले, तहसीलदार संगीता चव्हाण व सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्यासह वडोदबाजार व फुलंब्री पोलिस ठाण्याचा फौजफाठा तळ ठोकून आहे.  मयत प्रदीपच्या वडिलांच्या नावे केवळ १ एकर १५ गुंठे जमीन आहे. तसेच ते इतरांची जमीन वाट्याने करतात.यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्याच्या पश्चात आई -वडील व लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Web Title: Youth commits suicide in Aurangabad for Maratha reservation; Second event in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.