"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Hello, Is it PMO?; पंतप्रधान 'डू नॉट डिस्टर्ब मोड'वर आहेत, नंतर कॉल करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 08:06 PM2021-04-17T20:06:44+5:302021-04-17T20:07:57+5:30
राज्यात रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली आहे. यापार्श्वबूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची मागणीही केली आहे.
मुंबई - संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. राज्यात रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली आहे. यापार्श्वबूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची मागणीही केली आहे. एका स्थानिक वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 24 तासांत पंतप्रधान मोदींना तीनवेळा फोन केला. मात्र, त्यांचा प्रत्यक्ष संपर्क होऊ शकला नाही. यानंतर आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट करत, पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर उपरोधिक निशाणा साधला आहे. (Youth Congress leader satyajeet tambe on central government over remdesivir and oxygen supply to maharashtra)
देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!
काय आहे सत्यजीत तांबेंचं ट्विट -
सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान कार्यालयादरम्यानचा काल्पनिक संवाद मांडत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विट मध्ये, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान कार्यालयाला फोन लावतात आणि म्हणतात, की महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यासंदर्भात मला नरेंद्र मोदी यांच्याशी तातडीने बोलायचे आहे. यावर पंतप्रधान कार्यालयाकडून, सर, पंतप्रधान सध्या 'डू नॉट डिस्टर्ब मोड'वर आहेत, असे उत्तर येते. यानंतर उद्धव ठाकरे विचारतात, की पंतप्रधान केव्हा उपलब्ध होतील, यावर, 2 मेनंतर सर्व राज्यांच्या निवडणुका संपल्या की उपलब्ध होतील, असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून मिळते."
CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!
CM Uddhav T- Hello, Is it PMO ?
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 17, 2021
PMO- Yes Sir.
UT- I need to speak to PM for urgent Oxygen & Remedisivir supply for Maharashtra.
PMO- Sir, PM Sir is on "Do Not Disturb" mode.
UT- Ok, but when will he be available?
PMO- After 2nd May once all state elections are over.
🤷♂️
ऑक्सीजनची कमतरता -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून, 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 11.9 लाखांवर जाईल आणि ऑक्सीजनची मागणी 200 मेट्रिक टनवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या महाराष्ट्रात 1200 मेट्रिक टन ऑक्सीजनचे उत्पादन होते. मात्र, मागणी 1300 ते 1500 मेट्रिक टन ऑक्सीजनची आहे.
मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आवाहन -
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा उपलब्ध करणे, चाचणी केंद्रे वाढविणे आणि लसीकरणाला वेग देण्याबरोबरच, या लढाईत राज्य सरकारला शक्य ती सर्व प्रकारची मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योगांना केले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्रालादेखील झळ बसू नये, यासाठी उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!