तरुणांनी 40 दिवसांत पार केले 21 हजार किमी अंतर
By admin | Published: May 11, 2016 01:11 PM2016-05-11T13:11:17+5:302016-05-11T13:11:17+5:30
भारताला प्रदक्षिणा घालण्यासाठी तीन तरुणांनी हार्ली डेविडसन मोटारसायकलवर स्वार होत 40 दिवसांत तब्बल 21 हजार किलोमीटर अंतर पार करण्याची कामगिरी केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
कल्याण, दि. 11 - भारताला प्रदक्षिणा घालण्यासाठी तीन तरुणांनी हार्ली डेविडसन मोटारसायकलवर स्वार होत 40 दिवसांत तब्बल 21 हजार किलोमीटर अंतर पार करण्याची कामगिरी केली आहे. प्रेम पांडे, अनिकेत गुरव आणि वत्सल जोगानी अशी या तरुणांची नावे आहेत. हे तरुण कल्याण आणि बदलापूरचे रहिवासी आहेत. या प्रवासात त्यांनी संपूर्ण भारतातील राज्यांची भ्रमंती केली आहे.
कल्याणमधील प्रेम पांडे, बदलापूरातील अनिकेत गुरव आणि सुरत येथील वत्सल जोगानी या तिघा तरुणांनी आपला प्रवास 28 मार्च रोजी गुजरातमधुन सुरु केला. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, कन्याकुमारी, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, छत्तसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा मेघालय, भुतान, नेपाळचा प्रवास पूर्ण केल्यावर त्यांनी पुन्हा बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर,पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पुन्हा गुजरात असा प्रवास केला.
तिघेही दररोज 700ते 800 किमीचे अंतर ते कापत होते. मात्र अती दुर्गम भागात हाच प्रवास 200 ते 300 किमीचा होत होता. या प्रवासात त्यांना चीनच्या सीमेवर असताना बर्फाच्या वादळाचा सामना करावा लागला. वजा 10 अंश तापमानात या तरुणांना येथील कुपुक या गावातील ग्रामस्थांनी आसरा दिला. त्यामुळे त्यांच्यावर ओढावलेले संकट क्षमले.