तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
By admin | Published: May 9, 2014 07:26 PM2014-05-09T19:26:59+5:302014-05-09T22:21:02+5:30
नदीत पोहण्यासाठी गेलेल्या रोहकल (ता. खेड) येथील २९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली
चाकण : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या रोहकल (ता. खेड) येथील २९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनंता डोंगरे यांनी दिली.
दादाभाऊ बबन काळे (वय २९, रा. रोहकल, ठाकरवाडी, ता. खेड) असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबतची माहिती अशी : दादाभाऊ हा काल दुपारी साडेचारच्या सुमारास भामा नदीत पोहण्यासाठी गेला होता. त्याच्याबरोबर प्रकाश काळे हाही होता. आज सकाळी ११च्या दरम्यान दादाभाऊ याचा मृतदेह रोहकल गावाच्या हद्दीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याच्या पाण्यात तरंगताना आढळला. चाकण ग्रामीण रुग्णालयात त्याच्या शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.