त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दंगलीमध्ये युवक ठार
By admin | Published: July 14, 2015 11:45 PM2015-07-14T23:45:48+5:302015-07-14T23:45:48+5:30
आठ दिवसांपूर्वी विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या आदिवासी युवकाचा शवविच्छेदन अहवाल व पोलिसांच्या तपासाबाबत शंका उपस्थित करून हरसूलमध्ये (ता. त्र्यंबकेश्वर) काढण्यात
नाशिक : आठ दिवसांपूर्वी विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या आदिवासी युवकाचा शवविच्छेदन अहवाल व पोलिसांच्या तपासाबाबत शंका उपस्थित करून हरसूलमध्ये (ता. त्र्यंबकेश्वर) काढण्यात आलेल्या मोर्चाला मंगळवारी हिंसक वळण लागले़ पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला.
मोर्चेकऱ्यांनी गावातील घरे व पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक केल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रथम लाठीमार व नंतर गोळीबार केला़ त्यात रामदास बुदर (२६, मु़ वाजवड, ता़ पेठ) हा तरुण ठार झाला. दगडफेकीत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. घटनेनंतर हरसूलमध्ये तणावपूर्ण शांतता आहे़ जमावाला पांगविण्यासाठी गोळीबार केल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने राज्य राखीव दलासह सुमारे पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. (प्रतिनिधी)