युवा साहित्य-नाट्य संमेलन रत्नागिरीत

By admin | Published: February 20, 2017 03:13 AM2017-02-20T03:13:00+5:302017-02-20T03:13:00+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखा यांच्या वतीने आयोजित युवा साहित्य नाट्य

Youth Literature-Natya Sammelan Ratnagiri | युवा साहित्य-नाट्य संमेलन रत्नागिरीत

युवा साहित्य-नाट्य संमेलन रत्नागिरीत

Next

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखा यांच्या वतीने आयोजित युवा साहित्य नाट्य संमेलन २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीला होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची निवड करण्यात आली आहे. किरण सामंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते होणार आहे. या दोघांच्या हस्ते स्थानिक रंगकर्मींचा सत्कार करण्यात येईल. आसावरी शेट्ये यांच्या कवितांवर आधारित रंगमंचीय आविष्कार प्रदीप शिवगण आणि सहकारी सादर करणार आहेत. पहिल्या दिवसाचा समारोप चतुरंग गणेश गुळेनिर्मित ‘पुरुषार्थ’ या एकांकिकेच्या सादरीकरणाने होणार आहे. दुसऱ्या दिवशी संमेलनाध्यक्ष संदीप खरे यांची प्रकट मुलाखत आणि कवितावाचनही होणार आहे. निमंत्रित युवा कवींचे संमेलन होणार असून त्यात विजय बिळूर, विजय सुतार, सायली पिलंकर, अमेय गोखले, ऋजुता कुलकर्णी, ज्योती अवसरे-मुळे हे सहभागी होणार आहेत. आम्ही काय वाचतो आणि का वाचतो? या विषयावरील परिसंवादात वेदवती मसुरकर, वसुमती करंदीकर, विनिता मयेकर आणि ओंकार मुळे हे युवक सहभागी होणार आहेत. पत्रकार विनोद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होईल. समारोपाच्या सत्रात अभिनेते मनोज कोल्हटकर यांना रत्नभूषण पुरस्कार, नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
(प्रतिनिधी)
संमेलनाची वैशिष्ट्ये :
 या संमेलनाची सुरुवात नांदीने होणार असून, रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेचे युवा कलाकार ती सादर करतील.
 उद्घाटनापूर्वी रत्नागिरीच्या गंगाधरपंत गोविंद पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी मराठी अभिमान गीत सादर करतील.
 स्वा. सावरकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी सावरकरांची गीते युवा कलाकार समूहाने सादर करतील.
 नटराजवंदना आणि भरतनाट्यम्ही स्थानिक युवा कलाकार सादर करतील.
 ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या गमतीजमती गंगाराम गवाणकर सांगणार आहेत.

Web Title: Youth Literature-Natya Sammelan Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.