हृदय प्रत्यारोपणामुळे तरुणाला मिळाले जीवनदान
By admin | Published: August 4, 2015 01:09 AM2015-08-04T01:09:56+5:302015-08-04T01:09:56+5:30
बदलापूर येथे राहणाऱ्या अभिषेक (नाव बदलले आहे) २२ वर्षीय तरूण ५ महिन्यांपूर्वी आजारी पडला. रुग्णालयातील तपासण्यानंनतर त्याच्या
मुंबई: बदलापूर येथे राहणाऱ्या अभिषेक (नाव बदलले आहे) २२ वर्षीय तरूण ५ महिन्यांपूर्वी आजारी पडला. रुग्णालयातील तपासण्यानंनतर त्याच्या मेंदूत रक्ताचे क्लॉट झाल्याचे निदान झाले. अधिक तपासण्यांमध्ये त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान झाले.
या तरुणाला कार्डिओमयोपॅथी झाल्याचे निदान झाले. कार्डिओमयोपॅथीत हृदयाच्या स्नायू, रक्तवाहिन्या कडक होतात. यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे त्याच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम झाला होता. तसेच इंटराक्राईनल ब्लिड झाल्याने मेंदूच्या उतींना सूज आली होती. यामुळे बाजूच्या रक्तवाहिन्यांवर प्रेशर येऊन मेंदूत रक्तस्त्राव सुरू होतो, असे फोर्टीस रुग्णालयाचे कार्डिएक सर्जन डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले.
पाच महिन्यांपूर्वी निदान झाल्यावर त्या तरूणाला काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयाच्या दोन्ही बाजूंचे कार्य योग्य पद्धतीने होत नसल्याने त्याचा परिणाम किडनी, यकृताच्या कार्यावर देखील झाला होता. तीन दिवसांपूर्वी त्याला श्वासोच्छ्वासाला त्रास व अशक्तपणा वाढल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याची प्रकृती नाजूक झाली होती. हृदयप्रत्यारोपणाच्या यादीत त्याचे नाव होते. पण, हृदय कधी मिळेल याची शाश्वती नव्हती. रविवारी रात्री पुण्यातील एक ४२ वर्षीय महिलेला ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती मिळाली. यानंतर जहांगिर रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालयाचे बोलणे सुरू झाले. दोघांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असल्यामुळे हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य होते. त्या महिलारुग्णाच्या नातेवाईकाच्या परवानगी दिल्यावर हृदयप्रत्यारोपण करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी फोर्टीस रुग्णालयातून दोन डॉक्टर जहांगिर रुग्णालयात गेले होते. जहांगिर रुग्णालयातून हृदय घेऊन निघाल्यापासून अवघ्या १ तास ७७ मिनीटात हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरु केली, असे डॉ. मुळे यांनी सांगितले.