युवकांनी द्वेषाच्या राजकारणात पडू नये
By admin | Published: January 16, 2017 02:31 AM2017-01-16T02:31:00+5:302017-01-16T02:31:00+5:30
स्थानिक गटतट, द्वेषाच्या राजकारणात न पडता, युवकांनी आपली कार्यशक्ती राष्ट्राच्या विकासासाठी खर्ची घालावी
मुंबई : स्थानिक गटतट, द्वेषाच्या राजकारणात न पडता, युवकांनी आपली कार्यशक्ती राष्ट्राच्या विकासासाठी खर्ची घालावी, स्वामी विवेकानंद यांना अभिपे्रत असलेल्या भारताच्या प्रगतीसाठी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यात लावावी, असे आवाहन मान्यवरांनी युवा महोत्सवामध्ये केले.
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत, मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर’ या स्वंयसेवी संस्थेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष महंमद सिराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये, ‘सामाजिक परिवर्तन व तरुणांची जबाबदारी, महाग शिक्षण व्यवस्था आणि युवा आंदोलनाची गरज, सांस्कृतिक क्षेत्रात तरुणांपुढील आव्हाने, उद्योग व व्यापार आणि राजकारणातील तरुणांची भागीदारी,’ या विषयावर विविध मान्यवरांनी तपशीलवार मते व्यक्त केली. महंमद सिराज म्हणाले, ‘सध्याची युवा पिढी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र, त्यांच्या ज्ञानाचा वापर नकारात्मक बाबींकडे जास्त प्रमाणात होत आहे. त्याला प्रतिबंध घालून आपले कौशल्य समाजाच्या विकासात लावणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कार्यासाठी केला गेला पाहिजे. या वेळी उपाध्यक्ष रमेश कदम यांनी तरुणांनी कोणत्याही गटतट, पंथामध्ये विभागून न जाता, सामाजिक एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज व्यक्त केली. (प्रतिनिधी)