मराठवाडा महाविद्यालयात युवा सप्ताह
By admin | Published: January 22, 2016 12:53 AM2016-01-22T00:53:31+5:302016-01-22T00:53:31+5:30
मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये विविध उपक्रम झाले.
पुणे : मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये विविध उपक्रम झाले.
उदघाटन डॉ. संजीवनी गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तरुणांना ‘स्वामी विवेकानंदांचे विचार’ आणि ‘युवकाची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ‘जागतिक तापमान वाढ’ आणि पर्यावरणाशी निगडीत समस्यांबद्दल माहितीपट दाखवण्यात आले.
‘सायबर सिक्युरिटी’ या विषयावर मेधा काळे, त्रिशुल भुजबळ आणि निहार या कार्यकर्त्यांनी सायबर गुन्हेगारी, खबरदारी आणि उपाय या विषयावर मार्गदर्शन केले तसेच माहितीपट सादर करण्यात आले. ‘हुंडा एक अनिष्ट प्रथा’ या विषयावर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रानडे इन्स्टिट्युटच्या अर्जुन नलावडे याने फिरता करंडक जिंकला.
(प्रतिनिधी)