भिवंडीतील तरुणांकडे सापडले होते धागेदोरे

By admin | Published: April 7, 2016 02:38 AM2016-04-07T02:38:01+5:302016-04-07T02:38:01+5:30

मुंबईतील या भीषण बॉम्बस्फोटांनंतर भिवंडीतील ‘पडघा’ गावातील काही तरुणांचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले. त्यामुळे काही तरुणांना चौकशीसाठ़ी ताब्यात घेतले

Youth were found in the fenugreek | भिवंडीतील तरुणांकडे सापडले होते धागेदोरे

भिवंडीतील तरुणांकडे सापडले होते धागेदोरे

Next

मुंबई : मुंबईतील या भीषण बॉम्बस्फोटांनंतर भिवंडीतील ‘पडघा’ गावातील काही तरुणांचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले. त्यामुळे त्या दिशेने शोधकार्याला पोलिसांनी सुरुवात केली. यासाठी काही तरुणांना चौकशीसाठ़ी ताब्यात घेतले. त्यातील काही तरुणांकडे स्फोटके आणि एके- ४७ रायफल सापडल्या.
नाचन, अतिफ आणि हसीब या तिघांकडून शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली. त्यातील एका आरोपीने चौकशीदरम्यान जंगलात प्रशिक्षण दिले जात असल्याचा खुलासा केला. यातील फरार आरोपी ताहिर अन्सारी गावठी बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ होता, हे चौकशीतून समोर आले. या स्फोटांआधी वाहिद अन्सारी याच्या दवाखान्यात तयार बॉम्ब ठेवल्याचेही उघड झाले.
पेशाने अभियंता असलेल्या मुझम्मिल याचा बॉम्ब ठेवण्यामागे हात होता, हे ही स्पष्ट झाले. मुझम्मिलला घशाचा त्रास असल्याने त्याचा आवाज इतरांपेक्षा वेगळा होता. या वेगळ््या आवाजामुळे अनेक साक्षीदारांना त्याची ओळख पटली. (प्रतिनिधी)

साामन्य लोक, या हल्ल्यातील
पिडीत आणि मृतांना अखेरीस न्याय मिळाला. पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो
- सचिन वाझे ( तत्कालीन तपास अधिकारी) माझा मोठा भाऊ या बॉम्बस्फोटात गेला. न्यायालयाने या खटल्यातील एकाही आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली नाही. त्यांना कठोर शिक्षा करणे अपेक्षित होते. या निर्णयाचा विरोध करायला हवा. या निर्णयामुळे पिडीताचा एकही नातेवाईक आनंदी असेल, असे मला वाटत नाही.
- नंदकिशोर साळवी
(बॉम्बस्फोटात मृत पावलेल्या रमाकांत साळवी यांचे भाऊ) विशेष पोटा न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देऊ. मात्र अशाप्रकारच्या केसेसमध्ये विशेषत: जे आरोपी निर्दोष आहेत, त्यांना दीर्घकाळ जेलमध्येच काढावा लागू नये,यासाठी जलदगती न्यायालयाने स्थापण्यात यावी
- जमेत उलेमा- ए - हिंद
> घटनाक्रम
६ डिसेंबर २००२ :
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील मॅक्डोनाल्ड रेस्टॉरंटच्या एसीजवळ ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. यात २५ जण जखमी झाले. या स्फोटासाठी ‘क्रूड’ बॉम्बचा वापर करण्यात आला होता.
२७ जानेवारी २००३ :
विलेपार्ले पूर्व परिसरातील बाजारात सायंकाळच्या वेळी स्फोट झाला. या स्फोटात ३० जण जखमी झाले. यातील जखमी महिलेचा काही दिवसानंतर मृत्यू झाला. या ठिकाणी झालेल्या बाँम्बस्फोटातील स्फोटकांमध्ये तीक्ष्ण खिळ््यांचा वापर करण्यात आला होता.
१३ मार्च २०१३ :
सीएसटी - कर्जत लोकलमधील महिला प्रथम वर्गात बॉम्ब ठेवण्यात आला. ही लोकल मुलुंड स्थानकात आल्यावर स्फोट झाला. या स्फोटात १० जण ठार तर ६५ हून अधिक जण जखमी झाले. हा स्फोटवरील दोन स्फोटांपेक्षा अधिक शक्तीशाली होता.

Web Title: Youth were found in the fenugreek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.