रेल्वेखाली चिरडून युवकाचा मृत्यू
By admin | Published: June 27, 2016 07:27 PM2016-06-27T19:27:53+5:302016-06-27T19:27:53+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे भल्या सकाळी रेल्वखाली सापडून नितीन नारायण कांबळे (वय २४,रा.हिरज) याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बराच वेळ ओलटूनही लोहमार्ग पोलीस
एक तास रेल्वे रोखून धरली : आरपीएफच्या जवानांनी केले मृतदेह बाजूला
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे भल्या सकाळी रेल्वखाली सापडून नितीन नारायण कांबळे (वय २४,रा.हिरज) याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बराच वेळ ओलटूनही लोहमार्ग पोलीस व संबधित पोलीस घटनास्थळी दाखल होत नसल्याने चिडलेल्या हिरज वासीयांनी सिध्देश्वर एक्सप्रेस ४५ मिनिंटे रोखून धरली.
प्रसंग अवधान राखत आरपीएफ पोलिसांनी मृतदेह बाजूला करुन नागरीकांची समजूत काढली. आणि रोखली रेल्वे पुढे मार्गस्त झाली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही नितिन कांबळे हा रेल्वे खाली सापडून मृत अवस्थेत नागरीकांच्या निर्देशनास आला. आठ वाजले तरी लोहमार्ग पोलीस, आरपीएफ जवान किंवा रेल्वे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत व जबाब ही नोंदवला नाही. मृतदेह ताब्यात घेतला नाही. या मुद्देयावर चिडून जावून संताप नागरीकांनी सिध्देश्वर एक्सप्रेस ४५ मिनिंटे रोखून धरली.
आरपीएफ जवान धावले
रेल्वे रोखून धरलेल्या हिरज वासीयांचा रोश पाहता प्रसंग अवधान राखत सिध्देश्वर एक्सप्रेस मधील आरपीएफ जवान खाली उतरले. त्यांनी नागरीकांची समजूत काढत मृतदेह बाजूला केला आणि या घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तब्बल ४५ मिनिटा नंतर ही रेल्वे पुढे मार्गेस्त झाली.