Maharashtra Politics: “तीन काय तीस पक्ष एकत्र झाले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 03:54 PM2022-09-16T15:54:56+5:302022-09-16T15:55:55+5:30

उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असा दावा करत वरुण सरदेसाई यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

yuva sena leader varun sardesai said whether 30 party in alliance no one can beat shiv sena in bmc election 2022 | Maharashtra Politics: “तीन काय तीस पक्ष एकत्र झाले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार”

Maharashtra Politics: “तीन काय तीस पक्ष एकत्र झाले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार”

googlenewsNext

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी गड वाचवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. यातच तीन काय तीस पक्ष एकत्र आले, तरीही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार असल्याचा विश्वास युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरेंचे विश्वासूंपैकी एक असलेल्या वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी व्यक्त केला आहे. 

राज्यात जे काही घडत आहे ते गंभीर आहे ते समजून घेण्याची गरज आहे. भाजप, गद्दारांचा गट आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येणार आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करणार मी खात्रीपूर्वक सांगतो. तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरू शकणार नाहीत, असा मोठा दावा वरुण सरदेसाई यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे वरुण सरदेसाईही राज्यातील विविध भागात दौरे करत युवासेना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होते

सध्या जे काही घडत आहे ते खूप गंभीर आहे. सगळ्यात अगोदर शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होते. तो त्यांच्या पक्षाचा विषय होता. नंतर शिवसेना पक्ष फोडला. ज्या लोकांच्या मदतीने फोडला त्यांच्याकडून शिवसेना मूळ पक्षावर दावा करण्यात आला. आम्ही शिवसैनिक म्हणायचे आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करायची.मागील तीन दिवसात भाजप, गद्दारचा गट आणि माणसे एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एकट पडण्याचे प्रयत्न आहे. हे काय करू इच्छितात काय करू पाहतात हे समजून घ्या. उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला. 

दरम्यान, यांना ५० खोके मिळाले आणि कार्यकर्त्यांना फक्त तीन लाख आणि पैसे देऊनही मुख्यमंत्र्यांचे सभेला गर्दी जमत नसेल तर काय उपयोग, असा खोचक टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला.  जे बोलतोय ते अतिशय जबाबदारीने बोलत आहे. या नवीन सरकारमध्ये मुंबईचे किती मंत्री आहेत. एक आहे तो सुद्दा अमराठी आहे. मुंबईतील ३६ आमदारांमधून त्यांना एकही आमदार मराठी सापडला नाही. भाजपचे मुंबईमध्ये तीन खासदार आहेत, त्यापैकी दोन अमराठी आहेत. भाजपचे १३ आमदार आहेत. त्यापैकी ८ अमराठी आहेत. भाजपचे मुंबईमध्ये ८२ नगरसेवक आहेत.त्यापैकी ५० ते ५५ नागरसेवक अमराठी आहेत, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

Web Title: yuva sena leader varun sardesai said whether 30 party in alliance no one can beat shiv sena in bmc election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.