Maharashtra Politics: “शहाजीबापूंना विधान परिषदेची दिवास्वप्नं; शिवसैनिक आता सोडणार नाहीत”; शरद कोळी आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 02:04 PM2022-10-18T14:04:48+5:302022-10-18T14:05:31+5:30

Maharashtra News: या चाळीस आमदारांनी शहाजीबापू पाटील यांचा राजकीय वापर करून घेतला, असे शरद कोळी यांनी म्हटले आहे.

yuva sena sharad koli criticized shinde group mla shahaji bapu patil over his statement on vidhan parishad candidature | Maharashtra Politics: “शहाजीबापूंना विधान परिषदेची दिवास्वप्नं; शिवसैनिक आता सोडणार नाहीत”; शरद कोळी आक्रमक

Maharashtra Politics: “शहाजीबापूंना विधान परिषदेची दिवास्वप्नं; शिवसैनिक आता सोडणार नाहीत”; शरद कोळी आक्रमक

googlenewsNext

Maharashtra Politics: एका डायलॉगमुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेले बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) राज्यभरातील राजकारणात चांगलेच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी दौऱ्यावर असलेल्या शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावरून आता युवसेना आक्रमक झाली असून, शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 

युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या चाळीस आमदारांनी शहाजीबापू पाटील यांचा राजकीय वापर करून घेतला आहे. त्यांना आता आमदारकी जाईल याची भीती वाटत आहे. म्हणून त्यांनी अभिजीत पाटील यांना ऑफर दिली आहे, असे शरद कोळी म्हणाले. सांगोला मतदारसंघातील आमदार शहाजीबापू पाटील यांना आता दिवसा स्वप्ने पडू लागली आहेत. शिवसैनिक आता यांना सोडणार नाहीत. म्हणून त्यांनी पर्यायी मार्ग सुचवला असून अभिजित पाटील यांना सांगोला मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे, या शब्दांत शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांना सुनावले आहे. 

काय म्हणाले होते शहाजीबापू पाटील?

सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखे विधान परिषदेवर पाठवा. अभिजीत पाटील यांच्यासाठी पंढरपूरमधून परिचारक, मंगळवेढ्यातून अवताडे तर माढ्यामधून बबनदादा म्हणतेय माझा पोरग भाजपमध्ये पाठवतो. आपले झाडी डोंगर असे झालेय की, आपल्याला नांदेडमध्ये गेले की गर्दी, कोकणात गेले तरी गर्दी, त्यामुळे मला तुमच्यासारखे विधानपरिषदेवर घ्या आणि अभिजित पाटील यांना सांगोल्यात उमेदवारी द्या, अशी जाहीर मागणी शहाजीबापू पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्याकडे केली होती. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकर उपस्थित होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: yuva sena sharad koli criticized shinde group mla shahaji bapu patil over his statement on vidhan parishad candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.