युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुखाला धमकी, महाबळेश्वरात वागदरे यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला
By admin | Published: October 25, 2016 06:12 PM2016-10-25T18:12:17+5:302016-10-25T18:12:17+5:30
युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांच्या गाडीवर सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला करून गाडीची मोडतोड केली.
Next
आॅनलाईन लोकमत
महाबळेश्वर, दि. 25 - युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे यांच्या गाडीवर सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला करून गाडीची मोडतोड केली. केवळ मोडतोड करून हल्लेखोर थांबले नसून ‘टीव्हीवर झळकताय... आज काचेवर दगड पडलाय, उद्या डोक्यात पडेल,’ या आशयाची चिठ्ठी लिहून धमकी दिली आहे. यामुळे महाबळेश्वर शहरात तणाव निर्माण झाला असून, शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, शिवसेनेने तातडीची बैठक घेऊन हल्ल्याचा निषेध केला आहे.
महाबळेश्वरच्या मध्यवस्तीतील शिक्षक सोसायटीत सचिन वागदरे राहतात. रात्री उशिरा ते सोसायटीत आले. त्यांनी त्यांची गाडी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. मध्यरात्री तीननंतर दुचाकीवरून दोघेजण सोसायटीत आले.
त्यांनी मोठा दगड गाडीच्या मागील काचेवर टाकून काच फोडली. त्यानंतर हल्लेखोरांनी एक चिठ्ठी गाडीवर ठेवली. त्यावर ‘टीव्हीवर झळकताय आज गाडीवर दगड पडलाय, उद्या डोक्यात पडेल,’ असा मजकूर लिहला.
एका वाहिनीने पालिका राजकारणासंदर्भात आयोजित कार्यक्रमात सचिन वागदरे यांनी काही आरोप केले होते. त्यामुळे हा हल्ला झाला असावा, असा दावा सचिन वागदरे यांनी केला. तशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने तपास करीत आहेत.
काही संशयितांची चौकशी
पोलिसांनी काही संशयितांना पोलिस ठाण्यात बोलावून चौैकशी केली. दरम्यान, येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून, निवडणुकीचे वातावरण असल्याने शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी शिवसैनिकांनी संयम पाळावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
[5:50 PM, 10/25/2016] +91 80556 17111: मराठा समाजाचे निघत असलेले मूक मोर्चे हे शांततेच्या मार्गाने निघत असून सरकारला हि शांततेची भाषा समजत नसेल तर सरकारला वेगळ्या भाषेतही समजविण्यात येईल असा टोलाही यावेळी बोलतांना नितेश राणे यांनी सरकारला लगावला
Vdo पाठवला आहे
[5:52 PM, 10/25/2016] +91 95454 44807: खाजगीकरणातून संस्था मोडीत काढण्याचा शासनाचा प्रयत्न - अजित पवार
अकलूज : भाजप-शिवसेना युती शासनाच्या हाती कोणतेच विधायक कार्यक्रम नाहीत. शासनाच्या नाकर्तेपणा व चुकीच्या धोरणामुळे राज्याची अवस्था दयनिय झाली आहे. शासनाच्या कारभारावर शहरी व ग्रामीण भागातील कोणीच समाधानी नाहीत. खाजगीकरणाच्या माध्यमातून सहकारी, शैक्षणिक, पणन विरोधी धोरणे अवलंबून त्या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. सर्वांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची ताकद व धमक राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यशासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अकलूज येथे माळशिरस तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. विजयसिंह मोहिते-पाटील होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा निरीक्षक प्रदिप गारठकर, आ. हनुमंत डोळस, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, फत्तेसिंह माने-पाटील, जि.प.पक्षनेते धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई शिंदे, सहकार महर्षीचे उपाध्यक्ष रामचंद्र सावंत पाटील, रामेश्वर मासाळ, राजाबापू पाटील, राष्ट्रवादी सर्व सेलचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांनी करून प्रस्ताविकात तालुक्याची सभासद नोंदणी जिल्हात १ नंबरची झाली आहे. तालुक्यातील व तालुक्याबाहेरील काही मंडळी त्रास देतात. तालुक्यातील जनता राष्ट्रवादीच्या सदैव पाठीशी असल्याने सर्व निवडणुकीत पक्षाला चांगले यश लाभत आहे. आगामी जि प व पं स निवडणुकीत १०० टक्के यश संपादन करण्यात येईल. अजितदादांनी कार्यकर्त्याकडे लक्ष ठेवावे, असे सांगितले. यावेळी शिवसेनेच्या मोरोची, कळंबोली व फडतरी ग्रामपंचायतीचे सरपंचासह सदस्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचे स्वागत अजित पवार यांनी सत्कार करुन केले.
यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, १९९७ साली पक्ष स्थापनेपासून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नेतेमंडळींना विजयदादांनी बरोबर घेऊन पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. रणजितसिंहांनी देखील जबाबदारी चोख बजावली. परंतु तालुका राखीव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने पंढरपूर संघात विजयदादा उभे राहीले. त्यावेळी नको ते घडले, मात्र विजयदादा संयम व निष्ठा ढळू न देता अखंडीत कार्यरत राहिले. लोकसभेच्या वादळातही माढा लोकसभा संघात पक्षाचा दिवा तेवत ठेवला असल्याच्या विजयानंतर शरद पवार यांनी विजयदादांना दिल्या. परंतु पक्षातील काही मंडळी पायात पाय घालून पाडण्याचा प्रयत्न करतात, त्याचे उदाहरण विजयदादा व बाबाराजे यांचा पराभव आहे. जिल्ह्यात पक्षाची अवस्था आबांची गाडी, बाबांची बैलं, हाकतोय सख्या तर तानतोय तुक्या अशी झाली असून पक्षाने पक्षनिष्ठेला महत्व दिल्यास जिल्ह्यात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त होईल, असे सांगितले.
यावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील बोलताना म्हणाले, शरद पवार यांच्या मागे सदैव जिल्हा उभा राहीला आहे. निवडणुकीपुरते राजकारण नंतर समाजकारण असे कार्य आपले कार्य आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकत्रीत काम करणे गरजेचे असून जे गेले ते गेले राहीलेले आपले असल्याचे सांगितले.
पुढे अजित पवार म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोणत्याच समाजाचे लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले नाहीत. सरकार गेली अडीच वर्षे आरक्षणाचा अभ्यासच करीत असून त्यांची आरक्षण देण्याची मानसिकता नाही पाच वर्षात त्यांचा अभ्यास संपणार नाही. आज मराठा, धनगर, मुस्लिम समाज तीव्र अंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. या सरकारने जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असुन भांडवलदारांच्या हाताचे बाहुले बनले आहेत. शेतीमालाल हमी भाव नाही. शेतकºयांना मदत नाही. महागाई मात्र वाढतच असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. केवळ मार्केटिंग व जाहीरातबाजीला शासन प्राधान्य देत आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल विचारुच नका, असे सांगून विजयदादांमुळे तालुकाच नव्हे तर जिल्ह्याला, राज्याला दिशा मिळाली असून त्यांनी सर्वत्र विकासाची गंगा नेली. सत्ता वा पद नसताना ते कार्यरत राहिले आहेत. ओळखीचा नसलेल्याचीही त्यांनी कामे केली. जिल्ह्यासह राज्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी विजयदादांचे सहकार्य लाभले आहे, यापुढे सहकार्य रहावे, असे सांगताना राजकिय सत्तांतर घडत असतात त्याला खचून न जाता जोमाने कार्यकर्त्यांनी कामाला लागून यश खेचून आणावे. काहीजण दल बदलत असतात, अशा दलबदलूंना महत्व देण्याचे कारण नाही, असे शेवटी म्हणाले. सूत्रसंचलन हरीभाऊ मगर यांनी केले तर आभार आनंद पवार यांनी मानले.