३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी...; युवासेनेचा मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 01:19 PM2022-09-10T13:19:44+5:302022-09-10T13:20:24+5:30

या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची महत्त्वाची भूमिका असेल असं वरुण सरदेसाईंनी म्हटलं. 

Yuva Sena Varun Sardesai attacks the MNS-BJP-Eknath Shinde pre poll alliance | ३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी...; युवासेनेचा मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर खोचक टोला

३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी...; युवासेनेचा मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर खोचक टोला

Next

सोलापूर - गेल्या ३० वर्षात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हानं पेलली आहेत. यंदाचेही आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती व्होवो. ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत असा खोचक टोला युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसे-भाजपा-शिंदे गट संभाव्य युतीवर खोचक टोला लगावला आहे. 

निर्धार अभियानाची सुरुवात करण्यासाठी वरुण सरदेसाई तुळजापुरात पोहचले होते. यावेळी ते म्हणाले की, वारंवार निवडणुका पुढे ढकलण्यापेक्षा निवडणुका जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जायला शिवसेना तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही केवळ लढणार नाही तर जिंकणार आहोत असा विश्वास युवासेना सचिव वरुण सरदेसाईंनी व्यक्त केला. 

आदित्य ठाकरेंची भूमिका महत्त्वाची
आदित्य ठाकरे हे मुंबईचे पालकमंत्री होते. पालकमंत्री असताना त्यांनी अतिशय चांगले काम केले. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि या दर्जाला शोभेल असं काम आदित्य ठाकरेंनी केले. मुंबईकर त्यांना प्रतिसाद देतायेत. आता जरी आमचं सरकार नसलं तरी लोक हक्काने आदित्य ठाकरेंकडे प्रश्न घेऊन येत आहेत. तेदेखील मेहनत घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे नेतृत्व जरी उद्धव ठाकरेंचे असले तरी आदित्य ठाकरेंचा चेहरा शिवसेनेसाठी १०० टक्के आश्वासक आहे. मुंबईकर जनतेसाठी आश्वासक आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकीला सामोरे जावू. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची महत्त्वाची भूमिका असेल असंही वरुण सरदेसाईंनी म्हटलं. 

राज्यातील प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष पण...  
राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुठेतरी संघटना वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हे अतिशय दुर्देवी आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत, भास्कर जाधव हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. आम्हीही निर्धार अभियानाच्या माध्यमातून युवक, तरुणांसमोर जे काही प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू असा विश्वास वरुण सरदेसाईंनी व्यक्त केला. 
 

Web Title: Yuva Sena Varun Sardesai attacks the MNS-BJP-Eknath Shinde pre poll alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.