‘झाकीर नाईकचा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात’
By Admin | Published: July 23, 2016 04:34 AM2016-07-23T04:34:17+5:302016-07-23T04:34:17+5:30
मुंबई पोलिसांकडून सुरू असलेला चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली.
मुंबई : वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबत मुंबई पोलिसांकडून सुरू असलेला चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली. लवकरच हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी झाकीर नाईक यांची भाषणे, त्यांचे समर्थक, विरोधक तसेच सोशल मीडियावरील हालचालीवरून अधिक तपास सुरू केला. हा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून, लवकर तो मुख्यंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले. तसेच केरळ आणि राज्य एटीएसने इस्लामिक रिसर्च फाउण्डेशनच्या तसेच डॉ. झाकीर नाईक यांच्या सहकाऱ्याला अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पडसलगीकर यांनी शुक्रवारी पत्रकांराशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)