‘जलपरी’चे बिल घेतले परत!

By admin | Published: May 14, 2016 03:23 AM2016-05-14T03:23:21+5:302016-05-14T03:23:21+5:30

रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत चार कोटी रुपयांचे बिल झाल्याचे सांगत तत्काळ दोन कोटी चार लाख रुपये भरण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटताच

'Zaparpari' bill back! | ‘जलपरी’चे बिल घेतले परत!

‘जलपरी’चे बिल घेतले परत!

Next

नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
दुष्काळाचे चटके सहन करत असलेल्या लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा केला खरा. पण, रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत चार कोटी रुपयांचे बिल झाल्याचे सांगत तत्काळ दोन कोटी चार लाख रुपये भरण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटताच, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार हे बिल माफ करीत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत अखंड पाणीपुरवठा करत राहू असे आश्वासनही रेल्वेने दिले आहे.
रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, लातूर प्रशासनाने विचारणा केल्यामुळेच पाण्याचे हे बिल देण्यात आले. पण रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने हे बिल आम्ही मागे घेतले आहे. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली.
रेल्वेने तत्काळ टँकर मागवत ते सोलापूर आणि पुणे विभागात पाठविले आणि जलपरीची व्यवस्था केली. पहिले दहा दिवस लातूर आणि मिरजच्या प्रशासनाला पाइपलाइन टाकण्यासाठी लागले.
त्यानंतर ५० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. आतापर्यंत रेल्वेने सहा कोटी लीटरपेक्षा अधिक पाणी पोहोचविले आहे. लातूरला पाणीपुरवठा केल्याबाबत रेल्वेने चार कोटींचे बिल दिल्यानंतर या प्रकारावर रेल्वेला टीकेला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने बिल परत घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जाते. बिल माफ झाले : जिल्हाधिकारी पांडुरंग पोले
२३ दिवसांचे २.४ कोटी रुपयांचे बिल आले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे बिल भरण्यासंदर्भात कळविले होते. मात्र बिल रेल्वेने माफ केले असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले.पाण्याची गरज आहे, तोपर्यंत पाणीपुरवठा केला जावा. या प्रकरणात आर्थिक प्रश्नावरून अडवणूक होता कामा नये. - सुरेश प्रभू

Web Title: 'Zaparpari' bill back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.