सिनेनिर्माते महेश भट्ट यांना धमकाविणारा जेरबंद

By Admin | Published: March 3, 2017 06:17 AM2017-03-03T06:17:09+5:302017-03-03T06:17:09+5:30

सिनेनिर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या तरुणाला मुंबई गुन्हे शाखेने लखनऊमधून जेरबंद केले.

Zardabad threatens cinemist Mahesh Bhatt | सिनेनिर्माते महेश भट्ट यांना धमकाविणारा जेरबंद

सिनेनिर्माते महेश भट्ट यांना धमकाविणारा जेरबंद

googlenewsNext


मुंबई : सिनेनिर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या तरुणाला मुंबई गुन्हे शाखेने लखनऊमधून जेरबंद केले. अभिनेता होण्याचे स्वप्न भंगल्याने निराश झालेल्या या तरुणाने पैशांसाठी महेश भट्ट यांची पत्नी सोनी राझदान आणि मुलगी सिनेअभिनेत्री आलिया भट्ट यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
संदीप साहू (२४) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून व्यवसायात तोटा झाल्यानंतर त्याने लखनऊहून मुंबईत येऊन सिनेक्षेत्रात काम करण्याचे स्वप्न रंगवले. मात्र ते स्वप्नही भंगल्याने महेश भट्ट यांच्याकडूनच पैसे उकळण्याचा डाव त्याने रचल्याची प्राथमिक माहिती आहे.
महेश भट्ट यांना २६ फेब्रुवारी रोजी फोन करून आपण एका गँगचा लीडर असल्याचे सांगत त्यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली. मात्र कोणीतरी आपली मस्करी करत असल्याचे भट्ट यांना वाटले. पण काही वेळानंतर त्या व्यक्तीने भट्ट यांना या धमकीकडे दुर्लक्ष करू नये असे सांगत ‘एसएमएस’ व ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर संदेश पाठवले. 'मी जे सांगतोय ते ऐकले नाही तर मी तुमची बायको सोनी आणि मुलगी आलिया यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करेन' अशी धमकी त्याने दिली. त्याने भट्ट यांना एका विशिष्ट बँकेच्या लखनऊमधील शाखेमध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यामुळे भट्ट यांनी याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली.
खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक वत्स यांच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपीच्या मोबाइल लोकेशनवरून तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने मुंबई पोलिसांनी गुरुवारी लखनऊ येथे साहूच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी रात्री उशिरा त्याला मुंबईत आणण्यात आले. (प्रतिनिधी)
>50 लाखांची मागणी करताना आपण गँग लीडर असल्याचे त्याने सांगितले होते.
>साहू कोण आहे ?
मूळचा लखनऊचा रहिवासी असलेला साहू
२००४ ते १०मध्ये कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्यानंतर २०११मध्ये तो एजंट म्हणून काम करू लागला. त्यातून २०१६मध्ये त्याने चपलांचे दुकान सुरू केले.
मात्र त्यात त्याला तोटा झाला. अशात त्याला चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे तो गेल्या वर्षी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये येऊन गेला.
मात्र तेथेही त्याला यश मिळाले नाही आणि खिशातील होते तेवढे पैसे खर्च झाले. त्यातूनच त्याने महेश भट्ट यांचा मोबाइल क्रमांक मिळवून त्यांना धमकावल्याची माहिती तपासात समोर येत आहे.

Web Title: Zardabad threatens cinemist Mahesh Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.