धावत्या कारमधील चालकावर हल्ला करणारे जेरबंद

By admin | Published: June 28, 2016 08:48 PM2016-06-28T20:48:50+5:302016-06-28T20:48:50+5:30

वत्या कारमधील चालकावर प्राणघातक हल्ला करणा-या ५ हल्लेखोरांना गुन्हे शाखेने अटक केली. संदीप पिल्ले उर्फ सण्डी(२७), दिपक चौरसिया (२३), रुपेश लोणकर (२७) राजा देवेंद्र (४५

Zerband, who attacked the driver of a moving car, | धावत्या कारमधील चालकावर हल्ला करणारे जेरबंद

धावत्या कारमधील चालकावर हल्ला करणारे जेरबंद

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ -  धावत्या कारमधील चालकावर प्राणघातक हल्ला करणा-या ५ हल्लेखोरांना गुन्हे शाखेने अटक केली. संदीप पिल्ले उर्फ सण्डी(२७), दिपक चौरसिया (२३), रुपेश लोणकर (२७) राजा देवेंद्र (४५) आणि काली अशी अटक आरोपींची नावे आहेत. पूर्ववैमनस्यातून त्यांनी हा हल्ला चढविल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

डॉ. नवीन कुमार बिनॉय गुप्ता असे यामध्ये जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. २२ जून रोजी रात्री आठच्या सुमारास गुप्ता हे आपल्या महिला सहकारी सोबत कारने जात होते. त्याच दरम्यान पाठलाग करत असलेल्या चौकडीने त्यांच्यावर चॉपर आणि कोयत्याने वार केले. मात्र गुप्ता यांनी वेळीच वाहन सुसाट चालवून तेथून पळ काढला. रस्त्याच्या एका आडोशाला थांबून घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी गुप्ता यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला. 

घटनास्थळावरील सीसी टीव्ही फुटेज तसेच गुप्ता यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने अधिक तपास सुरु केला. वरीष्ठ निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांनी सांगितले.

Web Title: Zerband, who attacked the driver of a moving car,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.