सावली सोडणार साथ; महिनाभर ठिकठिकाणी येणार अनुभव, कसा कराल प्रयोग?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 07:07 AM2023-05-03T07:07:44+5:302023-05-03T07:07:58+5:30
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत.
मुंबई : वर्षभर आपल्यासोबत राहणारी सावली काही मिनिटांसाठी आपली साथ सोडून जाणार आहे. कारण संपूर्ण मे महिन्यात महाराष्ट्रात ठिकठिकाणी ३ ते ३१ मेदरम्यान शून्य सावली दिवस अनुभवास येणार आहे. सावंतवाडी येथे ३ मे रोजी, तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे दुपारी १२ ते १२.३५ या वेळेदरम्यान मोकळ्या जागी वा घराच्या छतावर किंवा अंगणात सूर्य निरीक्षण करता येईल. - प्रा. सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक
कसा कराल प्रयोग?
साहित्य : दोन ते तीन इंच व्यासाचा एक-दोन फूट उंचीची पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू, मनुष्य उन्हात सरळ उभी ठेवावी. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.
३ सावंतवाडी
४ मालवण, आंबोली
५ देवगड, राधानगरी
६ कोल्हापूर, इचलकरंजी
७ रत्नागिरी, सांगली, मिरज
८ कऱ्हाड, जयगड, अफजलपूर
९ चिपळूण, अक्कलकोट
११ महाबळेश्वर, फलटण,
तुळजापूर, वाई
१४ लोणावळा, अलिबाग, दाभाडे,
पिंपरी - चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई
१६ बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण,
भिवंडी, बदलापूर, नारायणगाव,
अहमदनगर, परभणी, नांदेड
१७ नालासोपारा, विरार, आसनगाव
१८ पालघर, कसारा, संगमनेर, हिंगोली