‘झिरो शॅडो’! आता रंगणार सावल्यांचा खेळ; ३ ते ३१ मेपर्यंत घेता येणार अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 02:02 AM2020-05-03T02:02:04+5:302020-05-03T06:44:44+5:30
महाराष्ट्रात ३ ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस आहेत. दुपारी १२ ते १२:३० या कालावधीत शून्य सावली ही वैज्ञानिक घटना अनुभवता येईल.
मुंबई : कोरोना, ऊन, पाऊस, अशा अनेक घटकांनी त्रासलेल्या महाराष्ट्रात सावल्यांचा खेळ सुरू होणार आहे, कारण आता शून्य सावलीचे दिवस सुरू होणार आहेत. खगोलशास्त्रीय भाषेत यास ‘^झिरो शॅडो’ असे संबोधले जात असून, ३ मेपासून सुरू होणारा हा सावल्यांचा खेळ ३१ मेपर्यंत कायम राहील.
सूर्य डोक्यावरून असतो तेव्हा उन्हातील व्यक्ती किंवा वस्तूची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. मात्र, ज्या वेळी काही क्षण ही सावली गायब होते, त्याला शून्य सावली असे म्हणतात.सध्या उत्तरायण असल्याने कडाक्याचे ऊन पडले असून, राज्यातील विविध शहरे व ग्रामीण भागात हा अनुभव दरदिवशी घेता येईल, अशी माहिती प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.
महाराष्ट्रात ३ ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस आहेत. दुपारी १२ ते १२:३० या कालावधीत शून्य सावली ही वैज्ञानिक घटना अनुभवता येईल. भारतात शेवटी मध्य प्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० अंशावरून कर्कवृत्त जाते. त्यामुळे हा प्रदेश शून्य सावलीचा शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावलीचा दिवस नसतो, कारण तेथे डोक्यावर लंबरूप सूर्यकिरणे पडू शकत नाहीत. महाराष्ट्रात मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे सावली गायब झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, जुलै महिन्यात ढगाळ वातावरणामुळे असे क्वचितच घडते.
शून्य सावली दिवस आणि ठिकाणे -
३ मे - सावंतवाडी, बेळगाव
४ मे - मालवण
५ मे - देवगड, राधानगरी, मुधोळ
६ मे - कोल्हापूर, इचलकरंजी
७ मे - रत्नागिरी, सांगली, मीरज
८ मे - जयगड, कराड
९ मे - चिपळूण, अक्कलकोट
१० मे - सातारा, पंढरपूर, सोलापूर
११ मे - महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर
१२ मे - माणगाव, बारामती, बार्शी, उस्मानाबाद, औसा
१३ मे - मुळशी, पुणे, दौंड, लातूर
१४ मे - अलिबाग, लोणावळा, तळेगाव-दाभाडे, पिंपरी-चिंचवड, जामखेड, अंबाजोगाई
१५ मे - मुंबई, नवी मुंबई, कर्जत, माथेरान, राजगुरूनगर, बीड, गंगाखेड
१६ मे - बोरीवली, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, खोडद, अहमदनगर, परभणी
१७ मे - नालासोपारा, विरार, आसनगाव, बसमत
१८ मे - पालघर, कसारा, संगमनेर, श्रीरामपूर, अंबड, हिंगोली
१९ मे - डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पुसद
२० मे - तलासरी, मेहेकर, वाशीम, वणी, चंद्रपूर, मूळ
२१ मे - मनमाड, कन्नड, चिखली
२२ मे - मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, यवतमाळ, आरमोरी
२३ मे - खामगाव, अकोला, वर्धा
२४ मे - धुळे, जामनेर, शेगाव, निम्बोरा, उमरेड
२५ मे - साक्री, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अमरावती
२६ मे - चोपडा, परतवाडा, नागपूर
२७ मे - नंदुरबार, शिरपूर, गोंदिया
२८ मे - शहादा, पांढुरणा