जिल्हा परिषद १४४, पंचायत समितीसाठी २६८ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 02:35 AM2017-02-06T02:35:22+5:302017-02-06T02:35:22+5:30

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चढाओढ पाचव्या दिवशीही सुरू होती

Zilla Parishad 144, 268 nominations filed for Panchayat Samiti | जिल्हा परिषद १४४, पंचायत समितीसाठी २६८ अर्ज दाखल

जिल्हा परिषद १४४, पंचायत समितीसाठी २६८ अर्ज दाखल

Next

अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची चढाओढ पाचव्या दिवशीही सुरू होती. यावेळी १४४ उमेदवारांनी तर पंचायत समितीसाठी २६८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजपा या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यात जिल्हा परिषदेसाठी ८१ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज दाखल केले, तर पंचायत समिती गणांसाठी १७२ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली.
रायगड जिल्हा परिषदेसाठीच्या ५९ जागांवर विजय मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले अस्तित्व पणाला लावले आहे.
जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी आपल्या पक्षाविरोधात उमेदवारी लढविणाऱ्याला चीत करण्यासाठी तुल्यबळ उमेदवार सर्वच पक्षांनी
दिले आहेत. जिल्हा परिषदेसाठी अलिबागमधून रविवारी शेतकरी कामगार पक्षातर्फे मापगावमधून दिलीप भोईर व काँग्रेसतर्फेराजा ठाकूर यांनी उमेदवारी दाखल
केली आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही दिग्गजांचे अर्ज दाखल होण्याचे संकेत अलिबागमधून प्राप्त होत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad 144, 268 nominations filed for Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.