जिल्हा परिषदा भाजपामुक्त?

By Admin | Published: March 9, 2017 04:43 AM2017-03-09T04:43:07+5:302017-03-09T04:43:07+5:30

राज्यातील जिल्हा परिषदा भाजपमुक्त ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जिथे सत्ता स्थापन करायची आणि हे दोघे एकत्र येऊनही जिथे सत्ता मिळत नाही तिथे राष्ट्रवादीने

Zilla Parishad is free from BJP? | जिल्हा परिषदा भाजपामुक्त?

जिल्हा परिषदा भाजपामुक्त?

googlenewsNext

- यदु जोशी, मुंबई

राज्यातील जिल्हा परिषदा भाजपमुक्त ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जिथे सत्ता स्थापन करायची आणि हे दोघे एकत्र येऊनही जिथे सत्ता मिळत नाही तिथे राष्ट्रवादीने शिवसेनेला बरोबर घ्यायचे आणि काँग्रेसने बाहेरून वा तटस्थ राहून पाठिंबा द्यायचा, असे नवीन समीकरण आता समोर आले आहे.
‘आम्ही दोघे एकत्र येऊन सत्ता स्थापन होतेय अशा ठिकाणी अन्य कुणाची मदत घेण्याचा प्रश्न नाही. अशा जिल्ह्यांबाबत उस्मानाबाद व आणखी एखादी जिल्हा परिषद सोडून आमची आघाडी जवळपास नक्की झाली आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले. आम्ही एकत्र येऊनही सत्ता मिळत नाही अशा ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे आणि काँग्रेसने मतदानात भाग न घेता अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्यावा, असा विचार सुरू झाला असल्याचे तो म्हणाला.
असे झाल्यास बीड, जालना, हिंगोली, यवतमाळ, बुलडाणा, नाशिक, कोल्हापूर व सांगलीमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या खेळीला शिवसेना काय प्रतिसाद देणार हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेची वाट भाजपाने सुकर केली. ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. अन्य आठ महापालिकांमध्ये सत्ता भाजपाकडे असेल हेही निश्चित आहे. (विशेष प्रतिनिधी)

शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत भाजपा आशावादी
जिल्हा परिषदांत शिवसेना व भाजपा एकत्र येतील, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला.
आता ते जिल्हा परिषदांत आम्हाला तसाच प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत, याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत त्यांनी दिले.

- तिन्ही पक्षांच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेत ‘कर्जमाफी नाही तर कामकाज नाही’, असे बजावत जोरदार घोषणाबाजी केली.

- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या खेळीला शिवसेना काय प्रतिसाद देणार हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेची वाट भाजपाने सुकर केली.

तर भाजपाकडे तीनच जि.प.
आता जिल्हा परिषदेबाबत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल. भाजपा-शिवसेना एकत्र आले तर २५ पैकी १४ जिल्हा परिषदांमध्ये युतीची सत्ता राहील. मात्र, भाजपाला बाजूला ठेवण्याचे अन्य या तिघांनी ठरविल्यास भाजपाची केवळ लातूर, वर्धा, चंद्रपूर या तीनच जिल्ह्यात सत्ता येईल. शिवसेनेच्या भूमिकेला त्यामुळेच महत्त्व आले आहे.

गेल्यावेळी विदर्भातील चार जिल्हा परिषदांमध्ये भाजपा - राष्ट्रवादीची आघाडी होती. यावेळी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार असतील तर आम्ही अप्रत्यक्ष पाठिंब्याचा विचार करू शकतो, असे काँग्रेसच्या
नेत्याने सांगितले.

Web Title: Zilla Parishad is free from BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.