Zilla parishad President Reservation List: जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर; राज्यात राजकारण रंगणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 20:18 IST2022-10-01T20:17:25+5:302022-10-01T20:18:44+5:30
ZP Election Reservation: ठाणे, पुणे सर्वसाधारण... तुमच्या जिल्ह्यासाठी कोणते आरक्षण पडले... सत्तेचे राजकारण जाणून घ्या एका क्लिकवर

Zilla parishad President Reservation List: जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर; राज्यात राजकारण रंगणार...
राज्यातील सुमारे ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदासाठीचे आरक्षण आज जाहीर झाले. राज्यातील ग्रा. पंचायतींच्या, नगर पालिका आणि महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आलेल्या असताना हे आरक्षण जाहीर झाले आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदा निवडणुकीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने काढली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता, ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्यानं येत्या काही काळात निवडणूक जाहीर होणार का याकडे ग्रामीण भागातील मतदाराचं लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदांसाठी असे आहे आरक्षण...
- ठाणे : सर्वसाधारण
- पालघर : अनुसूचित जमाती
- रायगड : सर्वसाधारण
- रत्नागिरी :नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- सिंधुदुर्ग : सर्वसाधारण
- नाशिक : सर्वसाधारण (महिला)
- धुळे : सर्वसाधारण (महिला)
- जळगाव : सर्वसाधारण
- अहमदगर :अनुसूचित जमाती
- नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)
- पुणे : सर्वसाधारण
- सोलापूर :नागरिकांचा मागास प्रवर्ग
- सातारा : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)
- सांगली :सर्वसाधारण (महिला)
- कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)
- औरंगाबाद : सर्वसाधारण
- बीड : अनुसूचित जाती
- नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
- उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)
- परभणी : अनुसूचित जाती
- जालना : नागरिकांचा मागस प्रवर्ग
- लातूर : सर्वसाधारण( महिला)
- हिंगोली : सर्वसाधारण (महिला)
- अमरावती : सर्वसाधारण (महिला)
- अकोला : सर्वसाधारण (महिला)
- यवतमाळ : सर्वसाधारण
- बुलढणा : सर्वासाधारण
- वाशिम : सर्वसाधारण
- नागपूर अनुसूचित जमाती
- वर्धा : अनुसूचित जाती (महिला)
- चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला)
- भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)
- गोंदिया : नागरिकांचा मागस प्रवर्ग
- गडचिरोली : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)