जि.प. शाळांच्या बांधकामाची चौकशी
By admin | Published: September 19, 2016 03:13 AM2016-09-19T03:13:35+5:302016-09-19T03:13:35+5:30
२००७ मध्ये वस्तीशाळांचे रूपांतर जि. प. शाळेत करुन तालुक्यात शासनाने एक कोटी, साठ लाख रुपये खर्च करून 24 शाळांची बांधकाम केली.
पारोळ/वसई : वसई तालुक्यात अदिवासी भागात २००७ मध्ये वस्तीशाळांचे रूपांतर जि. प. शाळेत करुन तालुक्यात शासनाने एक कोटी, साठ लाख रुपये खर्च करून 24 शाळांची बांधकाम केली. परंतु, ती निकृष्ट दर्जाची असल्याने मुलांना त्या शाळेत शिक्षण घेणे धोक्याचे झाले. त्यामुळे तिल्हेर येथील मुलांना समाज मंदिरात धडे गिरवावे लागत आहेत. याबाबतचे वृत लोकमत ने प्रथम प्रसिद्ध केल्या नंतर या बातमीच्या आधारे वसई तालुका काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष राम पाटील यांनी शिक्षण विभागाकडे माहीती मागवून शाळा बांघकाम घोटाळा उजेडात आणून हे प्रकरण विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मांडले असता या प्रकरणाची शिक्षण सचिवांकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
वसई तालुक्यात २१३ जि. प. शाळा असून २००७ साली बांघलेल्या शाळांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले. या शाळा सर्वशिक्षा अभियानाच्या निधीतून या शाळांचे बांधकाम करण्यात आले व तो निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आला. (वार्ताहर)
>अभियंता दोषी
सर्वशिक्षा अभियाना च्या अभियंत्याने शाळांच्या बांधकामाची गुणवत्ता न तपासता शालेय व्यवस्थापन समितीला हाताशी धरून ठेकेदाराचे बील देऊन मोठा गैर व्यवहार केल्याचे मागवलेल्या माहितीच्या आधारे समोर आले
आहे.