रत्नागिरीत उभारलं जाणार प्राणीसंग्रहालय; विधान भवनातील बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:15 PM2023-08-03T22:15:25+5:302023-08-03T22:15:42+5:30

सिंधुरत्न योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार

Zoo to be set up in Ratnagiri; Decision in the meeting in Vidhan Bhavan | रत्नागिरीत उभारलं जाणार प्राणीसंग्रहालय; विधान भवनातील बैठकीत निर्णय

रत्नागिरीत उभारलं जाणार प्राणीसंग्रहालय; विधान भवनातील बैठकीत निर्णय

googlenewsNext

Maharashtra Monsoon Session, Ratnagiri: रत्नागिरी येथे प्राणी संग्रहालय उभारले जाईल असा निर्णय विधान भवनातील आजच्या बैठकीत घेण्यात आला. प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी तज्ज्ञ सल्ल्यासह आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. रत्नागिरी येथे प्राणी संग्रहालय उभारणीबाबत आज मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार शेखर निकम, वन विभागाचे प्रधान सचिव व्ही. बी. रेड्डी, उपवनसंरक्षक विवेक होशिंग आदींसह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, "रत्नागिरी येथे प्राणिसंग्रहालय उभारण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून प्राणीसंग्रहालय साकारता येईल. प्राणीसंग्रहालयाच्या उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करण्यात येईल."

"देशातील अन्य प्राणीसंग्रहालयांची पाहणी करीत त्याच्या व्यवस्थापनाची माहिती करून घ्यावी. या प्राणी संग्रहालयामुळे कोकणातील पर्यटन वृद्धिसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल", असा विश्वासही मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तसेच प्राणी संग्रहालयाच्या उभारणीसंदर्भात विविध मौलिक सूचनाही मंत्र्यांकडून करण्यात आल्या. यावेळी उद्योग मंत्री सामंत यांनी प्राणी संग्रहालयासाठी जागा उपलब्ध असून सिंधुरत्न योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. 

Web Title: Zoo to be set up in Ratnagiri; Decision in the meeting in Vidhan Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.