बॅँक खात्यातून ३५ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:41 PM2019-02-06T22:41:10+5:302019-02-06T22:51:45+5:30
खर्डे : बनावट एटीएम कार्ड तयार करून अज्ञात व्यक्तीने देवळा येथील व्यावसायिक नीलेश मेतकर यांच्या बँक खात्यातून परस्पर पस्तीस हजारांची रक्कम काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्डे : बनावट एटीएम कार्ड तयार करून अज्ञात व्यक्तीने देवळा येथील व्यावसायिक नीलेश मेतकर यांच्या बँक खात्यातून परस्पर पस्तीस हजारांची रक्कम काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, देवळा येथील व्यावसायिक नीलेश दत्तात्रय मेतकर (वय ३१, रा. देवळा) यांच्या देवळा स्टेट बँकेच्या कर्जाच्या खात्यातून बुधवारी (दि. ३० जानेवारी) सायं. सहा वाजेच्या सुमारास लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी मुंबई येथील एटीएममधून सुरुवातीला २० हजार रु पये व त्यानंतर ६.३० वाजता पंधरा हजार असे ३५ हजार रु पये येथून काढण्यात आले. हा सर्व प्रकार मुंबईत घडत असताना नीलेश मेतकर मात्र देवळा येथील आपल्या दुकानात होते.
मोबाइलवर मेसेज पाहिल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले; मात्र आपले एटीएम आपल्याजवळ असताना पैसे कसे काढले? त्यासाठी त्यांनी बँकेत विचारणा केली; मात्र हे मुंबई येथील शाखेतून रक्कम काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नीलेश मेतकर यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्र ार अर्ज दाखल केला. तक्र ारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ विभागाकडे गुन्ह्याचा तपास व तपशील पाठविल्याचे पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी सांगितले. एटीएममधून दिवसाला विशिष्ट रक्कम काढण्याची सवलत असताना चाळीस, पन्नास हजार ते लाखापर्यंत पैसे कसे काढले जातात? त्यामुळे पैसे सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने बॅँकांनी अधिक महत्त्वाचे पाऊल उचलले पाहिजे.
- नीलेश मेतकर,
तक्र ारदार, देवळा.