मौलाना मुफ्तींचा आमदार निधी गेला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 11:47 PM2022-03-14T23:47:28+5:302022-03-14T23:49:33+5:30

मालेगाव : शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गुन्हेगारांना मोकळे सोडून सर्वसामान्य नागरिकांना पोलीस त्रास देत असल्याचा आरोप माजी आमदार ...

Maulana Mufti's MLA fund went back | मौलाना मुफ्तींचा आमदार निधी गेला परत

मौलाना मुफ्तींचा आमदार निधी गेला परत

googlenewsNext
ठळक मुद्देरशीद शेख : यंत्रमागधारकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

मालेगाव : शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गुन्हेगारांना मोकळे सोडून सर्वसामान्य नागरिकांना पोलीस त्रास देत असल्याचा आरोप माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचबरोबर आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या नाकर्तेपणामुळे चार कोटी आमदार निधीपैकी केवळ ९२ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित तीन कोटी आठ लाख रुपये निधी अखर्चिक झाल्याने हा निधी परत गेला असून, त्यामुळे शहरातील विकासकामे रखडली असल्याचेही शेख यांनी सांगितले.

रशीद शेख यांनी सांगितले, आमदारांनी शासनाकडून कुठलाही निधी आणला नाही. मात्र स्वतःचा आमदार निधीदेखील खर्च करता आला नाही. मध्य मतदारसंघातील रस्ते खराब आहेत. शहरातील यंत्रमागाला सवलतीच्या दरात होणारा वीजपुरवठा बंद झाला आहे. यंत्रमागाचा विजेचा प्रश्न गंभीर असताना शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी आमदार मुफ्ती सभागृहात करीत आहेत. शेती प्रश्नाबरोबरच यंत्रमागाच्या वीज सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असताना त्याकडे विद्यमान आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. उड्डाणपुलाचे काम त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच रखडले होते. आता ते काम सुरू झाले आहे. वर्षभरात काम पूर्ण केले जाईल. अंदाजपत्रकात त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही शेख यांनी सांगितले. शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. शहरातील अजिज मास्टर यांच्या घरात घुसून पोलिसांनी झडती घेतली. गुन्हेगारांना मोकाट सोडले जाते व सर्वसामान्यांना त्रास दिला जात आहे. न्यायालयाचा सर्च वॉरंट नसताना मध्यरात्री घराची झडती घेण्यात आली. याबाबत पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीसप्रमुखांकडे त्यांच्या कुटुंबीयांसह जाऊन त क्रार करणार असल्याचेही माजी आमदार शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक शकील जानी बेग उपस्थित होते.

Web Title: Maulana Mufti's MLA fund went back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.