100 वर्षे जुन्या वस्तू येथे काेट्यवधी रुपयांना मिळतात

By मनोज गडनीस | Published: January 29, 2023 12:46 PM2023-01-29T12:46:08+5:302023-01-29T12:46:34+5:30

डोक्यावर जे.जे. फ्लायओव्हर आणि त्याच्या सावलीत गजबजलेल्या मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील मिनारा मशिदीच्या समोरच्या बाजूने पायधुनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात उजवीकडे वळले की आपली पावले आपोआपच समोरच्या फुटपाथवर जातात.

100-year-old items fetch hundreds of rupees here | 100 वर्षे जुन्या वस्तू येथे काेट्यवधी रुपयांना मिळतात

100 वर्षे जुन्या वस्तू येथे काेट्यवधी रुपयांना मिळतात

googlenewsNext

- मनोज गडनीस 
डोक्यावर जे.जे. फ्लायओव्हर आणि त्याच्या सावलीत गजबजलेल्या मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील मिनारा मशिदीच्या समोरच्या बाजूने पायधुनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात उजवीकडे वळले की आपली पावले आपोआपच समोरच्या फुटपाथवर जातात. याचे कारण म्हणजे, त्या फुटपाथवर दिसतात अँटिक अर्थात दुर्मीळ वस्तूंनी भरलेली दुकाने. इतिहासाचे साक्षीदार राहिलेल्या या वस्तू बघण्यासाठी मग आपणही त्या फूटपाथवर रेंगाळतो. एरवी अँटिक वस्तू म्हटलं की, लोक आवर्जून उल्लेख करतात तो चोर बाजाराचा; पण चोर बाजाराच्या कित्येक पटींनी वैविध्यता असलेली ही दुकाने पायधुनीमध्ये १०० पेक्षा जास्त वर्षे आहेत अन् इथे वर्षभरात हजारो लोक येऊन आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदी करत घर अथवा कार्यालय सजवतात. 
१९२५ पासून अँटिक वस्तूंचे दुकान चालविणारे अनिस उल रेहमान यांची ही पाचवी पिढी आहे.

इथे केवळ भारतीयच नाही तर परदेशातूनदेखील अनेक लोक येतात. अनेक सिनेमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या दुर्मीळ वस्तू अशाच दुकानांतून खरेदी केल्या जातात, असे त्यांनी सांगितले. अन्य एक व्यापारी, आमीर शाहिद यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळतो. एखाद्या राजाची तलवार, राणीचे आभूषण किंवा राजवाड्यात वापरले गेलेले दिवे, खुर्च्या, सुरया या वस्तूंची प्रतिकृती साकारली जाते. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अशा वस्तू बनविण्याचे मोठे कारखाने आहेत. येथून या वस्तू अँटिक मार्केटमध्ये विकण्यासाठी येतात. या बाजारात किंमत वस्तूला नव्हे, तर हौसेला आहे.

किमतीचा अंदाज कसा लावणार?
ज्या खरोखर दुर्मीळ वस्तू आहेत, त्यांची किंमत निश्चित असते; पण ती दुकानदाराच्या मनात. ग्राहक आल्यानंतर घासाघिशीनंतर त्याची खरी किंमत ठरते; पण मुंबईच्या या बाजारातून आपल्या आवडीच्या वस्तूसाठी दोन ते तीन कोटी रुपयांपर्यंतदेखील पैसे लोकांनी मोजले आहेत. 

 मुगल-ए-आझमचा किस्सा...
मुगल-ए-आझम या चित्रपटातील दृश्यांसाठी वापरल्या गेलेल्या वस्तू या अनिल उल रेहमान यांच्याच दुकानातून गेल्या होत्या, तर अभिनेत्री मुमताजपासून असंख्य कलाकार, दिग्दर्शक यांचा या दुकानामध्ये कायम राबता असायचा.

हत्यारांचे आकर्षण
अलीकडे सिनेमा किंवा ओटीटीवर ऐतिहासिक सिनेमा अथवा सिरीज करण्याचा मोठा ट्रेंड आहे. यामधील पात्रांकडे त्यांची जी हत्यारे असतात, त्यांच्या प्रतिकृतींना मोठी मागणी आहे. 

 

Web Title: 100-year-old items fetch hundreds of rupees here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई