7-55-38
By Admin | Published: March 5, 2016 02:49 PM2016-03-05T14:49:24+5:302016-03-05T14:49:24+5:30
तोंडानं आपण काही म्हणू , आपली देहबोली खरं ते सांगतेच. संवादात भाषेचं महत्त्व केवळ 7 टक्के. आपल्याला काय म्हणायचं आहे ते हावभावांतून कळतं 55 टक्के आणि त्यातल्या अन्वयार्थाचा संदेश 38 टक्के ! आपली देहबोली शब्दांशी विसंगत बोलत असेल तर समोरच्यावर पडणारा प्रभाव असतो तब्बल 93 टक्के!
>
अर्थाचा अनर्थ करू शकणारा देहबोलीचा चांदणचकवा. लेखांक तीन
- वैशाली करमरकर
डॉ. डेस्मंड मॉरीस यांच्या ‘पीपल वॉचिंग’ या ग्रंथात मानवी देहबोलीचा जीवशास्त्रीय नजरेतून आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून घेतलेला धांडोळा मनोरम आहे. सर्वानी जरूर वाचण्यासारखा आहे.
सर्वानी का म्हणून?.
- तर याचे कारण म्हणजे आपल्या जगाच्या इतिहासात तूर्तास घडत असलेली दुसरी वादळी घटना! - ग्लोबलायङोशन म्हणजे जागतिकीकरण.
दुस:या महायुद्धाच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकलेले मानवसमूह आता हातात तराजू आणि डोक्यावर विकावू मालाच्या टोपल्या घेऊन व्यापार-उदिमासाठी एकमेकांसमोर येत आहेत. आठवडय़ाच्या बाजारांसारखा भोवती अफाट कलकलाट आहे. आपापला माल लवकरात लवकर खपावा असा आग्रह आहे. मग ग्राहकांच्या डोळ्यांतले भाव नको बरोब्बर ओळखायला? त्याच्या हावभावांचा अंदाज नको बांधायला?
या टोपलीतल्या मालावर प्रत्येक देशाचे लेबल आहे. प्रत्येक देशाचे पोट जगभर आपला माल जास्तीत जास्त खपण्यावर अवलंबून आहे. जसे दुकानाची प्रतिमा किंवा विक्रेत्याची वागणूक चांगली असेल तर त्याचा माल उत्तम खपतो, तसेच माल विकणा:या देशाची प्रतिमा सकारात्मक असेल तर टाकाऊ मालही जगभर उत्तम खपवता येतो.
आता ‘जग’ नावाच्या या बाजारपेठेत प्रत्येक देशाने थाटलेल्या दुकानाची ख्याती त्या-त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या प्रतिमेवर अवलंबून राहते.
तुरूतुरू तुरूतुरू विमानाचा जिना चढणा:या राष्ट्रप्रमुखाचे टीव्हीवरील दृश्य एका सेकंदात चारेक अब्ज लोकांर्पयत पोहोचते. त्यातून या राष्ट्रप्रमुखाच्या दुकानाबद्दल नकळत एक ठाम विश्वास तयार होतो.
यास्तव आज सर्व राष्ट्रप्रमुखांना देहबोली या विषयावरचे सक्त प्रशिक्षण घ्यावेच लागते. या प्रशिक्षणाची गरज ‘देश’ नावाचे दुकान जगाच्या बाजारपेठेत चालविण्यासाठी जशी आहे, तशीच आपापल्या देशातील नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठीसुद्धा योग्य देहबोलीचा वापर अत्यावश्यक बनला आहे. आपल्या देहबोलीच्या मदतीने त्यांना जणू कायम रंगमंचावर वावरायचे आहे. कॅमे:याच्या तिस:या डोळ्याचे सतत भान ठेवायचे आहे.
औद्योगिक क्रांतीच्या नंतर लोकशाही आणि भांडवलशाही पालथ्या आणि रांगत्या बाळांसारखी एकामागोमाग एक जन्माला आली. ‘लोक’ असे अभिधान असले, तरी ती ‘शाही’च. भांडवलदारांनी दिलेल्या पैशावर निवडणुका लढवणो, मतदारांना आपल्या देहबोलीने जिंकणो, ही देहबोली डिजिटल माध्यमातून आपल्या प्रजेपुढे ठसवत राहणो याशिवाय ‘लोक’शाही व्यवस्थेला दुसरा पर्याय नाही. ही ‘जग’ नावाच्या बाजारपेठेची आणि जगभर फुलू पाहणा:या ‘लोक’-शाही नावाच्या भ्रामक वसंतऋतूची गोष्ट आहे.
देहबोलीच्या या गवगव्याचा संबंध तुमच्या- माङयाशीसुद्धा आहे. कारण काळाच्या टप्प्यावर आपले संवाद फक्त आपल्या गल्लीतल्या आणि वाडीतल्या लोकांशीच सीमित नाहीत. या संवादाने देशांच्या आणि संस्कारांच्या अनेक सीमा ओलांडण्याचा वेग सतत वाढत आहे. विद्यापीठातून बाहेर पडलेला उमेदवार नोकरीसाठी घाम पुशीत पुशीत मुलाखतीच्या निमित्त डायरेक्टरसाहेबांच्या केबिनमध्ये जातो. ओळखीचे शिफारसपत्र देतो आणि नोकरी मिळेल अशा आशेत राहतो. हे दिवस आता फार थोडे उरले आहेत. सातासमुद्रापलीकडे बसलेला कोणतातरी एक आवाज प्रथम तुमचा टेलिफोन इंटरव्ह्यू घेतो. तुमच्या देहबोलीतल्या मुळाक्षरांपैकी तुमचा आवाज, त्याची टीप, तुमच्या बोलण्याचा वेग, एखादा प्रश्न विचारल्यावर त्यात होणारे बदल किंवा तुम्ही घेतलेला पॉझ यावरून तुमच्याबद्दल अंदाज बांधतो. यातून तुम्ही सहीसलामत पास झालात तर पुढचा टप्पा स्काईपवरून इंटरव्ह्यू. आता तुमचे डोळे, नजर, चेह:याचे हावभाव, हाताच्या हालचाली या सर्व गोष्टी मिळून प्रश्नकत्र्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वकाही खरेखरे केव्हाच सांगून टाकतात त्याचा तुम्हाला पत्ताही लागत नाही.
देहबोलीशास्त्रत या त:हेच्या फॉम्यरुल्याला सात-पंचावन्न-अडोतीस असे सांकेतिक नाव आहे. डॉ. आल्टबर्ट मेहेराबियान या आरमेनियम वंशाच्या मानसशास्त्रज्ञाने हा फॉम्यरुला शोधून काढला.
यातले सात टक्के म्हणजे भाषेने केलेले संदेशवहन. पंचावन्न टक्के म्हणजे हावभावांनी पोहोचवलेले संदेश आणि त्यातून निघालेला अन्वयार्थ, तर अडोतीस टक्के म्हणजे तुमच्या आवाजामुळे तुम्ही समोरच्या माणसार्पयत पोहोचवलेला संदेश. थोडक्यात ‘मला कुठे काय झालंय? छान आहे की!’ असे शब्द समजा तुम्ही बोललात, पण तुमची देहबोली (हावभाव+आवाज) या शब्दांशी विसंगत काहीतरी बोलली तर त्या देहबोलीचा समोरच्या माणसावर 93 टक्के प्रभाव पडतो. शब्दांची विश्वासार्हता न राहिल्यात जमा होते. कारण संदेशवहनात तिचा उपयोग फक्त सात टक्के असतो.
देहबोलीवरील हे सर्व संशोधन तुमच्या माङयासाठी खूप उपयोगी ठरते. याचे दोन फायदे होतात. एक तर स्वत:ची देहबोली स्वत: निरखण्याची संवेदनशीलता तयार होते. माङया देहबोलीमुळे समोरच्या माणसाला कुठचे संदेश जात आहेत याचे भान राहते. हा अवेअरनेस किंवा ही जाणीव सतत जोपासली तर ‘अंतरीचा ज्ञानदिवा’ उजळत ठेवण्याची एक सुंदर सुरुवात होते. दुसरा फायदा म्हणजे समोरच्या माणसाची देहबोली सजगपणो निरखली तर त्याच्या मनातल्या गूढ विहिरीच्या तळातले भावनिक हिंदोळे लक्षात येतात. लक्षात आले की ते समजून घेण्याची धडपड करावीशी वाटते. शब्दांची टरफले दूर सारून त्या माणसाच्या गाभ्याकडे लक्ष देण्याची सवय लागते.
मोबाइल, इंटरनेट यांनी उभ्या केलेल्या मयसभेने माणूस माणसाला पारखा झालाय? की जवळ आलाय? अनुक्त देहबोलीने खरं तर या प्रश्नाचे उत्तर केव्हाच देऊन ठेवले आहे, नाही का?
आशियन देशातला ‘नमस्कार’
काय म्हणतो?
माणसामाणसात अपार वैविध्य आहे. भेद आहेत. मला मान्य आहे, पण प्रत्येक माणसात अंशभूत असलेली ‘ऊर्जा’ एकच आहे. जसे विद्युत प्रवाह एकच, पण तो आविष्कृत होतो वेगवेगळ्या माध्यमातून. हा प्रवाह खोलीतील तपमान कमी करतो, तर कधी वाढवतो. त्याचे रूपांतर कधी स्फोटकात होते, तर कधी बर्फात. ऊर्जा तीच. स्वरूपे अनेक. स्वरूपापलीकडच्या या सामायिक ऊज्रेला माङो नमन.
‘नजर’ आणि समानता
गुजरातमध्ये मोठय़ा शहरांच्या बाहेर अनेक विदेशी कंपन्यांनी आपापले अजस्त्र कारखाने उघडले आहेत. तेथे प्रमुख पदावर काम करणा:या युरोपीयन स्त्रीवर्गाची एकमुखी एक तक्रार आहे, ती म्हणजे भारतीय मनुष्यबळ आम्हाला समानतेची वागणूक देत नाही. एका सत्रत मी त्यांना विचारले, ‘म्हणजे नेमके काय? मला जरा विस्ताराने आणि उदाहरणांसकट सांगता का?’ - या प्रश्नावरील या युरोपीयन स्त्री मॅनेजर्सची उत्तरे पुरेशी बोलकी आहेत.
‘माङो मॅनेजर फाईल हातात देताना माङयाकडे न बघता देतात’, ‘प्रेङोंटेशन्सच्या वेळी मी एखादा प्रश्न विचारला तर सादरीकरण करणारा इंजिनिअर दुस:यांकडे बघत माङया प्रश्नांचे उत्तर देतो. हा किती उद्दामपणा आहे.’ - नजरेने केलेले संदेशवहन त्या युरोपीयन स्त्रियांच्या मेंदूने आपापल्या पद्धतीने ग्रहण केले, त्याचा अर्थ लावला आणि कप्प्यांमधे बंदिस्त करून टाकला. भारतीय लोक आम्हाला कमी लेखतात, असे घट्टमुट्ट लेबलही या कप्प्यावर चिकटवून टाकले. वरिष्ठ पदावरील स्त्रीच्या नजरेला नजर न देणो हा भारतीय संदर्भात आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, हे खरे; पण ते त्या युरोपियन स्त्रियांना कसे कळावे?
(समाप्त)
(लेखिका आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ असून, ग्योथे इन्स्टिटय़ूट माक्स म्यूलर भवन येथे विपणनप्रमुख (कॉपरेरेट ट्रेनिंग) म्हणून कार्यरत आहेत.)
vaishalikar@gmail.com