घरापासून अर्ध्या तासावर आग पोहोचते, तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:03 AM2020-01-19T06:03:00+5:302020-01-19T06:05:05+5:30

विस्तीर्ण, हिरवागार ऑस्ट्रेलिया. कांगारूंचा, समुद्राच्या फेसाळ लाटांचा, सोनेरी वाळूचा देश. इथे राहण्याचं स्वप्न पाहताना कधीच मनात आलं नाही की इथेही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते.

About half an hour after the fire reaches the house, .. | घरापासून अर्ध्या तासावर आग पोहोचते, तेव्हा..

घरापासून अर्ध्या तासावर आग पोहोचते, तेव्हा..

Next
ठळक मुद्देघरापासून अध्र्या तासाच्या अंतरावर जेव्हा आग पोहोचली, तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकला.

- डॉ. प्राजक्ता साठे-वैद्य

ऑस्ट्रेलियात बस्तान बसवायच्या तयारीने नवरा व मुलं यांना घेऊन थेट महाराष्ट्रातून ऑस्ट्रेलियाला (मेलबर्न) आलेली स्नेहल ही तरुणी. विस्तीर्ण, हिरवागार ऑस्ट्रेलिया. कांगारूंचा, समुद्राच्या फेसाळ लाटांचा, सोनेरी वाळूचा देश.
इथे राहण्याचं स्वप्न पाहताना कधीच मनात आलं नाही की इथेही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. अजून इथे कायमस्वरूपी नोकरी नाही, व्हिसाही दीर्घकालीन नाही, अशात वणवे पेटले. 
स्नेहलच्या मनात सगळ्यात आधी विचार आला, ‘हा देश सधन, सक्षम आहे सरकार पाहून घेईल.’
मात्र घरापासून अध्र्या तासाच्या अंतरावर जेव्हा आग पोहोचली, तेव्हा मात्र तिच्या काळजाचा ठोका चुकला. हवेत पुष्कळ धूर व जळक्या लाकडाचा वास पसरला, मग वाटू लागलं की आपण आता भारतात असतो तर? एका हाकेसरशी आपले नातेवाईक, आप्तेष्ट धावत आले असते. घर वणव्यात सापडलं तर कुठे जायचं, हा प्रश्न भारतात तुलनेनं सोपा होता. कितीतरी दारं आपल्यासाठी आनंदानं उघडी असणार होती.
बरं, इथे शेजारही अनोळखी. काय होतं आहे ते समजण्यासाठी ऑनलाइन माहितीवर काटेकोर नजर ठेवणं हाच एक मार्ग. आता मात्र घालमेल झाली. इथपर्यंत यायला आपण किती कष्ट, किती खर्च केला ! आपला निर्णय चुकला का?.
इथे फार परकं वाटतंय, असं जाणवलं. टीव्हीवर सतत एकच विषय.. ‘बुशफायर’ ! 
या वणव्यांमध्ये सापडलेले, जीव गमावलेले प्राणी, नेसत्या वस्रानिशी गाव सोडून निघालेली माणसं त्याचबरोबर घरदार वार्‍यावर सोडून अनोळखी लोकांसाठी रात्रंदिवस प्राण पणाला लावणारे अग्निशामक दलातले स्वयंसेवक हे सारं पाहून रडू कसंबसं आवरलं. 
त्याचक्षणी प्रत्यय आला की इथली संकटं आता ‘आपली’ वाटत आहेत. आपणही या देशाचा एक घटक आहोत. भारतात घडलेल्या दुर्घटना ऐकून, जसा काळजाला चटका बसतो, अगदी तसाच या आगीनंही बसतो आहे.. संकटातून तावून-सुलाखून या देशाशी आपलं नातं अजून घट्ट झालं आहे.
- डॉ. प्राजक्ता साठे-वैद्य
मेलबर्न, ऑस्ट्रेलियाprajaktasvaidya@gmail.com

Web Title: About half an hour after the fire reaches the house, ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.