अलेग्रिया ई फोलिया.

By admin | Published: February 13, 2016 05:18 PM2016-02-13T17:18:39+5:302016-02-13T17:18:39+5:30

ब्राझील म्हटलं की जगाच्या ओठावर पहिल्यांदा नाव येतं ते फुटबॉल, नंतर सांबा आणि त्यानंतर तिथला कार्निवल! कलासक्त, स्वच्छंदी रूपाची ओळख सांगणारा हा महोत्सव सध्या रिओ इथे सुरू आहे. त्याचीच ही ऑँखो देखी झलक.

Alegria e folia | अलेग्रिया ई फोलिया.

अलेग्रिया ई फोलिया.

Next
>- सुलक्षणा व-हाडकर
 
 
 
सध्या रिओमध्ये कार्निवलची धमाल चालू आहे. पोर्तुगीज भाषेत एका शब्दात कार्निवलबद्दल सांगायचं झालं तर राष्ट्रीय पातळीवरील ‘अलेग्रिया ई फोलिया’ म्हणजे आनंद, क्रेझीपणाचं कलासक्त आणि स्वच्छंद असं रूप.
ब्राझीलमध्ये सगळीकडे कार्निवलची धूम आहे. रिओमध्ये सर्वप्रथम 1641 च्या आसपास कार्निवल सुरू झालं. काहींच्या मते ते 19 व्या शतकात सुरू झालं, तर काहींच्या मते ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये मद्याच्या देवतेसाठी हा उत्सव करण्यात येत होता. विशेषत: ग्रीक संस्कृतीत वसंताच्या आगमनानिमित्त सोमरसाची देवता पुजली जात होती. हाच उत्सव पुढे बदलून कार्निवल झाला. युरोपमधून पोर्तुगीज राज्यकत्र्याबरोबर तो ब्राझीलमध्ये आला आणि इथलाच असावा इतका एकरूप होऊन गेला. 
कार्निवल काळात साधारण दोन दशलक्ष लोक रस्त्यावर येऊन एकत्र खातात, पितात, नाचतात आणि परेडमध्ये फिरतात. शिवाय हे सर्व कोणत्याही पोलीस संरक्षणाशिवाय! सगळेजण नियम पाळतात. कुठेही हुल्लडबाजी नाही, छेडछाड नाही कि विनयभंग! 
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर उत्सवाचं स्वरूप असतं. जो तो रंगीबेरंगी वेशभूषा करून फिरत असतो. केसांत तुरे घालून, विविध टोप्या घालून सांघिकरीत्या लोक परेड करताना दिसतात. शहराच्या विविध भागात म्हणजे ब्लोकोमध्ये मोठय़ा उघडय़ा गाडीत संगीत चालू असतं. आवडत्या गायकाला किंवा म्युङिाक बॅण्डच्या साथीने लोक त्या त्या विभागातील म्युङिाकल परेडमध्ये सहभागी होताना दिसतात. 
कार्निवल काळात ब्राझीलमध्ये राष्ट्रीय सुटय़ा असतात. त्या त्या शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रकृतीप्रमाणो उत्सवाचं स्वरूप असतं.  
या कार्निवलदरम्यान इथे 4क्क् दशलक्ष लिटर बियर प्यायली जाते, असं म्हटलं जातं. एकूण वर्षभराच्या पाच टक्के बियर कार्निवल काळात प्यायली जाते. मात्र काचेच्या बाटलीतील बियर पिण्यास मनाई केली जाते. त्याऐवजी टीनच्या कॅनमधील बियर सगळीकडे दिसते. रस्त्याने चालता चालता आम जनता बियर पीत नाचत असते. वातावरणात एक प्रकारची धुंदी असते. काचेच्या बाटल्यांचा खच रस्त्यावर पडल्यास दुखापत होऊ शकते म्हणून कॅनची सक्ती करण्यात आलीय. लोकही हा नियम नेमानं पाळतात. 
लहान लहान हातगाडय़ांवर गरीब वर्ग बर्फाच्या जोडीने हे बियर कॅन विकताना दिसतात. कचरा एका ठिकाणी साचला जातो. तो तत्परतेनं दुस:या दिवशी उचलला जातो. हे टीनचे कॅन पायाने चपटे करून भंगारमध्ये विकले जात असावेत. कारण दुस:या दिवशी भल्या पहाटे किंवा अगदी रात्री उशिरापर्यंत अनेक जण स्पोर्ट्स शूज घालून हे कॅन चपटे करताना दिसतात. म्हणजे अव्याहतपणो शेकडोने कॅन चपटे केले जातात. आणि मोठय़ा मोठय़ा पिशव्यांमध्ये भरले जातात. कधी कधी अख्खं कुटुंब हे करताना दिसतं. 
एस्पेचिनो हा पदार्थ कार्निवलचा पारंपरिक पदार्थ म्हणायला हवा. टर्किश केबाबसारखा दिसणारा किंवा आपल्या चिकन कबाबसारखा दिसणारा हा ‘ग्रिल्ड मिट’चा केबाब इथल्या पारंपरिक फारीन्हाबरोबर तिखट सॉसबरोबर दिला जातो. उभ्या उभ्या खाता खाता सांबाच्या संगीतावर पावलं थिरकत परेड पुढे जाताना अनेक जण आपले मुखवटे, सरताज सांभाळत पुढे जाताना दिसतात. 
आफ्रिकन संस्कृतीमधील सांबा नृत्य हे कार्निवलचं खास आकर्षण. ब्राझीलमध्ये सांबा नृत्यप्रकार गरीब-श्रीमंत हा भेदभाव दूर करतं. अन्यथा ब्राझीलच्या मुख्य प्रवाहात कृष्णवर्णीय म्हणजे फुटबॉल, संगीत आणि नृत्य. मुख्य प्रवाहात हा रंग अजून तितका उठून दिसत नाही. अगदी वर्तमानपत्रतील जाहिराती पाहिल्या की लक्षात येतं. जिथं आवर्जून लिहिलं जातं, ‘आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त गोरा रंग किंवा थोडासा मिसळलेला रंग’. सध्याच्या सरकारनं ह्या वर्गासाठी म्हणजे आर्थिकदृष्टय़ा गरीब वर्गासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. तरीही मुख्य प्रवाहात यायला त्यांना थोडा वेळ लागेल असं दिसतं.
सक्तीच्या मतदानात ह्या वर्गाने सध्याच्या राज्यकत्र्याना निवडून दिलंय हे खरं असलं तरी  जेव्हा जेव्हा इथल्या प्रेसिडेंटचं भाषण टीव्हीवर दाखवलं जातं तेव्हा तेव्हा वरच्या वर्गातील, उजळ रंगाचे ब्राझीलियन घरात अंधार करून, स्वयंपाकघरातून तवे, कॉफीची भांडी एकमेकांवर वाजवून राज्यकत्र्याचा निषेध करताना दिसतात. 
कार्निवलच्या लेखात हे सांगण्याचा उद्देश हा की, कार्निवलशिवाय कृष्णवर्णियांसाठी स्वत:ला व्यक्त करण्याचं व्यासपीठ मर्यादित आहे.
रिओमधील रस्त्यारस्त्यांवरील कार्निवल परेडप्रमाणो सांबा स्कूलमधील भव्य चित्ररथांची परेडसुद्धा जगप्रसिद्ध आहे. जगभरातून लक्षावधी पर्यटक ह्या निमित्तानं रिओमध्ये येतात. तब्बल 96 तास न थांबता हे चित्ररथ आपापली कल्पना नृत्य, संगीत आणि वेशभूषेच्या माध्यमातून सर्वासमोर आणतात. आपल्याकडे 26 जानेवारीला राजपथावर ज्याप्रकारे चित्ररथांची मिरवणूक असते त्याचप्रमाणो हे चित्ररथ सामाजिक संदेश देत किंवा वैविध्यपूर्ण संकल्पना घेऊन नृत्य बसवितात.  
सांबा परेडमध्ये जे चित्ररथ असतात त्यावर पिसांच्या पेहरावात नृत्य करणारी मुख्य नृत्यांगना आपल्याला नेहमी दिसते. तिच्या हातात तिच्या सांबा स्कूलचा ङोंडा असतो. हा ङोंडा तिच्या पिसांच्या पेहरावाला किंवा अंगाला लागता कामा नये किंवा ङोंडय़ाच्या दांडय़ाला लागता कामा नये. असं झाल्यास त्या स्कूलला निगेटिव्ह गुण मिळतात. अत्यंत कुशल नृत्यांगनेला चित्ररथाच्या वर नृत्य करण्याची संधी मिळते.  
या काळात जवळपास पाच लाख पर्यटकांची गर्दी इथे होते. रिओला जगाची कार्निवल राजधानी म्हटलं जातं. अत्यंत कलात्मक नृत्यांचा आविष्कार ह्यानिमित्ताने जगाला पाहता येतो. 
कार्निवलची तारीख पारंपरिक रोमन कॅथॉलिक दिनदर्शिकेनुसार ठरवली जाते. इस्टर संडेच्या साधारण सहा आठवडे आधी ‘अॅश वेन्सडे’च्या दिवशी म्हणजे इस्टरच्या 4क् दिवस आधी पाच दिवस चालणारा कार्निवल साजरा केला जातो. 
रिओ कार्निवलमध्ये सहभागी होणारे नर्तक म्हणजे सांबा स्कूलमधील बहुतेक सर्व नर्तक हे रिओमधील फवेलामधील असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणारे सर्वसामान्य लोक ह्यात सहभागी होतात. जिवाचं रान करून, अथक मेहनत करून चित्ररथात ते आपली कला सादर करतात. 
सध्याच्या रिओ कार्निवलमध्ये आफ्रिकन लोकांची छाप दिसते. इथे आलेल्या आफ्रिकन लोकांच्या तरुण पिढीनं त्यांची संगीत, नृत्यसंस्कृती कार्निवलच्या निमित्तानं जगासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.
 
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
sulakshana.varhadkar@gmail.com

Web Title: Alegria e folia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.