एकटे सुख

By admin | Published: March 12, 2016 03:05 PM2016-03-12T15:05:32+5:302016-03-12T15:05:32+5:30

दोन दिवसात मी स्वयंपाकाची भांडी, धान्य, भाज्या, इतर किराणा सामान आणले. घर झाडून लख्ख पुसून काढले. तयार पडदे खिडक्यांना लावले. इलेक्ट्रीशिअन, प्लंबर शोधले. जमतील तशा पोळ्या शिकलो. भात, पिठले, कोशिंबिरी, भाज्या यात आठ-दहा दिवसांत गती आली. फोडण्या जमू लागल्या. हळूहळू घर माङया सभोवती आकार घेत गेले आणि माङया मनाची तगमग शांत होत गेली.

Alone happiness | एकटे सुख

एकटे सुख

Next
>- सचिन कुंडलकर
 
 
दोन दिवसात मी स्वयंपाकाची भांडी, धान्य, भाज्या, इतर किराणा सामान आणले.  घर झाडून लख्ख पुसून काढले. तयार पडदे  खिडक्यांना लावले.  इलेक्ट्रीशिअन, प्लंबर शोधले.  जमतील तशा पोळ्या शिकलो. भात, पिठले, कोशिंबिरी, भाज्या यात आठ-दहा दिवसांत गती आली. फोडण्या जमू लागल्या.
हळूहळू घर माङया सभोवती आकार घेत गेले आणि माङया मनाची तगमग शांत होत गेली.
आपल्या एकटेपणाला नीट घाट, पोत आणि आकार देत त्याचे चांगल्या गोष्टीत रूपांतर करण्याचा खेळ मी हळूहळू शिकलो.
 
 
स्थलांतर केल्याचा नक्की असा एक दिवस नसतो. खूप आधी मनामध्ये आतल्याआत सामान बांधणो चालू झालेले असते. विचारांचे जाळे विणायला सुरुवात झालेली असते. 
आपण शहर नक्की कधी सोडतो हे आठवेनासे होते. तो एक दिवस असा काही नसतो, ती एक प्रक्रिया असते. आजूबाजूच्या वातावरणातला प्राणवायू पुरेनासा होतो आणि मनाला पोषणासाठी वेगळ्या जगाची आस लागून राहते. मी पुणो शहर नक्की कधी सोडले ते मला आजपर्यंत आठवत नव्हते. असे काही एक दिवस होते का? ते कळत नव्हते. पण परवा एका नव्या मित्रशी गप्पा मारता मारता त्या काळातले काही सांगता सांगता मला तो दिवस आठवला. मी शहर सोडल्याचा एक निश्चित असा दिवस होता. मित्रच्या कारमध्ये माङो सगळे सामान भरून भल्या पहाटे मुंबईत पाल्र्यात जिथे माझी राहायची सोय केली होती त्या घरी जायला निघालो होतो. दिवस सोपा नव्हता. मी सगळा प्रवास गप्प बसून केला होता. माङो भरपूर सामान आणि ढिगावारी पुस्तके वरती पोचवून माझा मित्र मला म्हणाला होता की, ‘चल, मी आता निघतो. नीट राहा. काही लागले तर कळव.’ आणि तो लिफ्टपाशी गेला. 
त्या घरातला फोन बंद पडला होता. घरात गॅस नव्हता. जुना एक फ्रीज होता, जो गेली पाच-सहा वर्षे बंद होता आणि नशिबाने नळाला पाणी होते. माङया पोटात जबरदस्त खड्डा पडला होता. फ्रान्समध्ये शिकताना, तिथला सिनेमा बघताना एकटी राहणारी माणसे पाहून तसे राहण्याचे फार आकर्षण मनात तयार झाले होते. शिवाय इथे गौरीची पुस्तके वाचून आमचे सदाशिवपेठी मन, प्रत्यक्ष जाण्याधीच युरोपला पोचलेले. आता बसा बोंबलत. त्या कर्वे-परांजपे लोकांची पुस्तके वाचून भारावून जा, पाहा अजून युरोपातले सिनेमे, त्यांच्या स्टायली मारायला जा. राहा एकटे.
त्याक्षणी मला पहिली उबळ आली ती म्हणजे धावत खाली जावे, मित्रला मिठी मारून म्हणावे की ‘माझी मोठी चूक झाली. चल सामान गाडीत भरू आणि आत्ताच्या आता मला पुण्याला घेऊन चल’. पण का कोण जाणो मी तसे केले नाही. तो परत जाताना मला वरून दिसला. गाडीत बसण्याआधी त्याने मला हात केला, तो हसला आणि त्याची गाडी कोप:यावर वळून लुप्त झाली. ह्या सगळ्या गोष्टी मोबाइल फोन हातात येण्यापूर्वीच्या काळात घडल्या. 
घर प्रशस्त होते. सहाव्या मजल्यावरचे हवेशीर. मजल्यावरची बाकीची दोन्ही घरे बंद. फक्त हेच एक घर राहते असणार होते. डाव्या बाजूच्या घरातले लोक अमेरिकेत राहत होते आणि उजव्या बाजूच्या घरात नुकतीच कुणीतरी गळफास लावून आत्महत्त्या केली होती. त्यामुळे ते घर बंद करून ते लोक निघून गेले होते. ह्या गोष्टीची भीती मला जाणवेल असे मला वाटले नव्हते. पण माझा मित्र निघून जाताच मला ती भीती तीक्ष्णपणो जाणवली आणि मला हमसून हमसून रडू आले. डोळ्यांत पाणी वगैरे नाही. चांगले भरपेट रडू. तिथल्या तिथे. ‘उगाच आपण असे धाडस केले. भलत्याच विचारांच्या अधीन झालो. कशाला एकटे जगायचे आहे? चांगले आईवडिलांच्या घरात राहत होतो काय कमी होते?’ - मन स्वत:च्याच निर्णयांना विरोध करायला लागले. मी डोळे पुसले आणि मला तेव्हा अचानक चहाची तल्लफ आली. असे वाटले की सिनेमात लोक पितात तसे दु:ख झाले असता गरम चहा पीत नीट विचार करावा, नाक फुरफुरत. पण घरात काहीही सामानच नव्हते. मी कुलूप लावून खाली उतरलो, कोप:यावरल्या टपरीवर चहा प्यायलो. एसटीडीवर जाऊन पुण्याला घरी फोन करून सांगितले की ‘मी नीट पोचलो, माझी काळजी करू नका.’ मी असा कधी एकटा रिकाम्या घरात राहिलो नव्हतो, जिथे फक्त रिकामा ओटा आणि रिकामी कपाटे होती. पॅरिसमध्ये मी तीन महिने एकटा राहत होतो, पण ती हॉटेलची खोली होती आणि त्यात शेजारच्या सर्व खोल्यांत आमच्या फिल्मच्या कोर्सला आलेली मुलेच राहत होती. घरात आलो आणि मनातला सगळा रिकामेपणा समोर येऊन पुन्हा उभा राहिला. घर उभे करायला कुठून सुरुवात करावी? 
मग पुढच्या दोन दिवसात मी रिकामे डबे, स्वयंपाकाची भांडी, धान्य, भाज्या, मसाले, इतर किराणा सामान आणले. घर झाडून लख्ख पुसून काढले. तयार पडदे आणून खिडक्यांना लावले.  बिल्डिंगच्या कचरा गोळा करणा:या माणसांना माङया घराची वर्दी लावून दिली. गॅस आणला. इलेक्ट्रीशिअन, प्लंबर ह्यांना शोधून काढले. जमतील तशा पोळ्या करायला शिकलो. भात, पिठले, कोशिंबिरी आणि भाज्या यांच्यात आठ-दहा दिवसांत गती येत गेली. फोडण्या जमू लागल्या. हळूहळू घर माङया सभोवती आकार घेत गेले आणि माङया मनाची तगमग शांत होत गेली.
.आठ-दहा दिवसातच ती एक सुंदर संध्याकाळ आली, ज्या दिवसाचे स्वप्न पाहत मी घर सोडले होते. माङया पुढय़ात मी शिजवलेले गरम गरम जेवण होते. फ्रीजमध्ये गार सरबत, पाणी आणि बियरच्या बाटल्या होत्या. घर अतिशय स्वच्छ झाले होते. घरातला लॅँडलाइनचा फोन चालू झाला होता. नवे पडदे वा:यावर उडत होते. घरात मडोना गात होती. समोरच्या पार्ले बिस्कीट फॅक्टरीमधून ताजी गरम बिस्किटे भाजली गेल्याचा सुंदर वास आसमंतात पसरला होता. (पुढे अनेक आठवडे मी ही बिस्किटे भाजण्याची वेळ लक्षात ठेवून त्यावेळी घरी परत यायचो. एकटेपणा कमी करण्यासाठी. कारण त्या वासाने काहीतरी घरगुती प्रेमळ वातावरण तयार होत असे) मुंबईत सूर्योदय किंवा चंद्र वगैरे असे उगाच दिसत नाहीत. घरात झाडे, वेली लावता येत नाहीत. आपल्याला आपल्या घरातले छोटे आनंद असे शोधून काढावे लागतात. मी गरम गरम जेवणाचे शांत घास घेत माङया नव्या घराकडे कौतुकाने पाहत होतो आणि स्वत:ला सांगत होतो की आपल्याला शहर सोडून दुसरीकडे जाणो जमले आहे. शेल्फमध्ये नीट रचून ठेवलेल्या माङया पुण्यातल्या खोलीतून आलेल्या पुस्तकांची मला त्यावेळी मोठी सोबत वाटली. त्या क्षणापर्यंत पोचायला मात्र मला खूप मेहनत घ्यावी लागली. 
आपल्या एकटेपणाला नीट घाट, पोत आणि आकार देत त्याचे चांगल्या गोष्टीत रूपांतर करण्याचा खेळ मी त्या दहा दिवसात शिकलो. त्यानंतरचे प्रश्न मी हळूहळू धडपडत सोडवले. ह्या नव्या शहरात आपले मित्र जमवणो, काम शोधणो, ह्या शहराच्या वागण्याच्या चालीरीती शिकणो हे सर्व जमत गेले. पण मुंबईतली ती संध्याकाळ मला आजपर्यंत विसरता आलेली नाही. घरकामाला कमी मानण्याचा तो दुर्दैवी काळ होता. बाहेर जाऊन वसवस करत पैसे मिळवणो जास्त महत्त्वाचे मानले जाई आणि घरात राहून जाणतेपणाने आणि नेमकेपणाने ते चालवणा:या व्यक्तींना कमी प्रतिष्ठा मिळत असे. याचे कारण आमच्या पुण्यातले विनोदी आणि अर्धवट फेमिनिझम आणि त्याचा प्रचार करणा:या कर्कश बुद्धिमान बायका. मी त्यांचे फार कधीच ऐकले नाही आणि घरातल्या सगळ्या मुलींना, बायकांना पाहत त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत वाढलो. त्या सगळ्यांनी मला घरकामाला तयार केले आणि त्याला कमी न लेखण्याचे आपल्या कृतींमधून दाखवत ठेवले. 
मला आजही माङो घरकाम स्वयंपाक आणि त्याची हजारो व्यवधाने आयुष्यातल्या अनेक ताणांपासून मुक्त ठेवतात. ते माङो स्पोर्ट आहे. क्रिकेट किंवा बॅडमिंटन असावे तसे. आणि जगात बाहेर पडून कर्तृत्व गाजवणा:या अनेक व्यक्तींइतकाच आदर मला निगुतीने शांतपणो आणि संयमाने उत्तम घरे चालवणा:या आणि नेटका स्वयंपाक करणा:या हुश्शार व्यक्तींबद्दल आहे. किंबहुना त्यांच्याविषयी थोडासा जास्तच. 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com

Web Title: Alone happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.