अमेरिकन यशाचे भारतीय Spelling

By admin | Published: June 6, 2015 02:26 PM2015-06-06T14:26:05+5:302015-06-06T14:26:05+5:30

अभ्यास केला नाहीस तर आयुष्य वाया जाईल’ असा दम भरणारे पालक फक्त भारतातच असतात असे नाही. हे पालक अमेरिकेसारख्या देशात येतानाही मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा हा आग्रह घेऊन येतात आणि मुलांनी शालेय वयातच आपली गुणवत्ता सिध्द धरावी असा नुसता हट्ट धरून थांबत नाहीत, तर त्यासाठी मुलांच्याबरोबरीने कष्टही करतात.

American Success of American Spelling | अमेरिकन यशाचे भारतीय Spelling

अमेरिकन यशाचे भारतीय Spelling

Next
  सोनाली जोशी
 
अभ्यास केला नाहीस तर आयुष्य वाया जाईल’ असा दम भरणारे पालक फक्त भारतातच असतात असे नाही. हे पालक अमेरिकेसारख्या देशात येतानाही मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा हा आग्रह घेऊन येतात आणि मुलांनी शालेय वयातच आपली गुणवत्ता सिध्द धरावी असा नुसता हट्ट धरून थांबत नाहीत, तर त्यासाठी मुलांच्याबरोबरीने कष्टही करतात. - याचे हल्ली मोठे प्रस्थ असलेले आणि दरवर्षी बातम्यांमध्ये झळकणारे प्रत्यंतर म्हणजे अमेरिकेतली ‘स्पेलिंग बी’. (अवघड) इंग्रजी शब्दाचे (त्याहून अवघड) स्पेलिंग अचूक सांगण्याच्या या राष्ट्रीय स्पर्धेत भारतीय वंशाच्या मुलामुलींनी सातत्याने मिळवलेले यश हा सध्या अमेरिकेत (आणि अर्थातच भारतातही) चर्चेचा विषय आहे. यावर्षी वन्या शिवशंकर (वय 13)  आणि गोकुल वेंकटाचलम (वय 14)  या दोन भारतीय वंशाच्या मुलांनी संयुक्तरीत्या ‘स्पेलिंग बी’च्या विजेतेपदाचा चषक उंचावल्यावर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांमध्ये भारतीयांच्या या वर्चस्वावर तिरक्या, वंशद्वेषी प्रतिक्रियांचा सूरही अमेरिकेत उमटला.
संपन्न जीवनाच्या शोधात अमेरिकेत आलेल्या भारतीयांच्या पहिल्या पिढीने महासागर ओलांडला तो 196क्-7क्च्या दशकात. त्यांच्या मुलांचे संसार आता अमेरिकेत मध्यावर आले आहेत. शिवाय नंतरच्या डॉट कॉम लाटांनी आणलेले नवे स्थलांतरितही आता अमेरिकेत स्थिरावले आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, सीए याचबरोबर नामांकित कंपन्यांचे सी.इ.ओ भारतीय वंशाचे आहेत. सिलिकॉन व्हॅलीत अनेक तरुण भारतीय उद्योजक आहेत. याशिवाय टॅक्सी ड्रायव्हरपासून मोटेल, पेट्रोल पंप आणि रेस्टॉरंट्स अशा ठिकाणी 
भारतीयांची संख्या वर्षागणिक वाढते  आहे. आजवर भारतीय स्थलांतरितांचे यश आर्थिक पातळ्यांवर मोजले जात असे. गेल्या काही वर्षात या यशकथेला 
काही सामाजिक आयामही मिळाले आहेत. अमेरिकन कौटुंबिक/शैक्षणिक जीवनात महत्त्वाच्या अशा 
‘स्पेलिंग बी’ स्पर्धेवर सलग वर्चस्व हा त्यातला नवा आयाम!
 स्थलांतरितांची बदलती आव्हाने 
अगदी सुरुवातीला अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांच्या पहिल्या पिढीला आर्थिक वा शैक्षणिकदृष्टय़ा यशस्वी व्हायला तुलनेने कमी त्रस झाला. पात्रता असलेले लोक कमी, संधी व जागा जास्त असे समीकरण त्यांना मिळाले.  मात्र त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर अधिक अकटोविकटीच्या संघर्षाना सामोरे जावे लागले. भारतापासून तुटलेपणा जाणवणो, अमेरिकन समाजात सामावून न घेतले जाणो हे खडतर आव्हान होते.
199क् नंतर इथे आलेले आशियाई आणि त्यातही भारतीय; संख्येने जास्त होते. या सर्वाना व त्यांच्या पुढच्या पिढीला तांत्रिक सोई मिळाल्या. तुटलेपणा संपला. आपली माणसे, कला, साहित्य याच्याशी दुवा सांधता आला. अमेरिकनांना नाईलाजाने यांची सवय करून घ्यावी लागली. या स्थलांतरितांकडे संख्येचे बळ होते. पण याच संख्येमुळे उपलब्ध संधीकरता स्पर्धा मात्र वाढली. पात्रतेनुसार संधी मिळवता आल्या तरी त्याचा एक स्तर वंश  आणि वर्ण यानेही ठरवला जातो हे कटू सत्य या स्थलांतरित भारतीय अमेरिकनांना मान्य करावे लागले. एक भारतीय वंशाचा मुलगा दुस:या भारतीय वंशाच्या मुलाशी संधीकरता स्पर्धा करतो असे चित्र याच कालावधीत स्पष्टपणो समोर आले. गेल्या काही वर्षात अमेरिकेतल्या भारतीय मुलांना उत्तमोत्तम कॉलेजमध्ये प्रवेश आणि उत्तम नोकरी हे तुलनेने तितके सोपे उरलेले नाही. ‘मुलांनो, किमान एक गोष्ट अशी करा की, ज्याची नोंद राष्ट्रीय स्तरावर होईल’ हा या भारतीयांच्या पालक म्हणून जगण्याचा कळीचा मुद्दा बनला, तो म्हणूनच! त्यामध्ये ‘स्पेलिंग बी’सारख्या स्पर्धा परीक्षेत यश हा एक राजमार्ग होता. स्पर्धा परीक्षा वा उत्तम कॉलेज वा उत्तम नोकरी मिळवणो हे एकमेकांशी जोडलेले आहे हे समीकरण या पिढीने मांडले. 
 राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा
अमेरिकन घरांना या स्पर्धापरीक्षा नवीन नाहीत. यशस्वी विद्याथ्र्याचे कौतुक, बक्षिसे याला समाजात मान आहे. कोणतेही क्षेत्र वा विषय यात राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पातळीवर यश मिळवणो याचे महत्त्व लहान मुलांपासून सर्वाना परिचित आहे. मुलाला ज्या विषयात वा कलेत गती आहे, ज्यात रस आहे ते तो निवडेल  आणि तो तयारी करेल असा सर्वसाधारण समज इथे असतो. अमेरिकन पालक मुलांना बेसबॉल, फुटबॉल आणि पियानो क्लासला जरूर नेतात, पण यशस्वी झालेच पाहिजे याची त्यांची व्याख्या आणि स्थलांतरित भारतीयांची वा आशियाई लोकांची व्याख्या वेगळी आहे. भारतीयांकरता  नुसता भाग घेणो पुरेसे नाही तर ‘यशस्वी झालेच पाहिजे’ अशी जवळजवळ पूर्वअट आहे. स्थलांतरित भारतीय आणि अमेरिकन यांचा आयुष्य़ाकडे बघण्याचा सामाजिक आणि व्यक्तिगत दृष्टिकोन वेगळा आहे. भारतीयांचे मूळ त्यांच्या मायदेशात रोवलेले आहे. मेहनत आणि पाठांतर या दोन भक्कम पायावर ती शिक्षणसंस्था उभी आहे. इथे असलेल्या भारतीयांना एखाद्या गोष्टीला स्कोप आहे, तिच्यामुळे अनेक फायदे आहेत ही भाषा समजते. त्यांना स्पर्धा आणि कॉलेजचा प्रवेश हे ध्येय गाठण्याकरता अमुक गोष्ट कराविशी वाटते.
 प्रयत्न, स्पर्धा आणि यश
गणित, विज्ञान, भूगोल  आणि ‘स्पेलिंग बी’ अशा विविध स्पर्धा परीक्षांना अमेरिकेतली मुले केजीपासून बसतात. शाळेनुसार काही परीक्षा वा सोयी कमीअधिक प्रमाणात उपलब्ध असतात. ब:याच ठिकाणी पालक-शिक्षक संघटना या स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्पर्धा घेण्याचे काम करतात. आंतरशालेय स्पर्धेपासून सुरुवात करून विद्यार्थी एक एक फेरी पार करत राज्यस्तरावर आणि मग राष्ट्रीय स्तरावर निवडले जातात. साधारणपणो प्राथमिक शाळेत सर्व मुलांना वरील परीक्षांची तोंडओळख होते. भारतात फोफावलेली खासगी क्लासेसची व्यवस्था आता अमेरिकेतही रुजली आहे. ‘स्पेलिंग बी’ करताही अशाच स्वयंसेवी आणि खासगी संस्थांकडून (नॉर्थ साउथ फाउंडेशन)  मार्गदर्शन, चाचणी परीक्षा, विभागवार फे:या उपलब्ध आहेत. 
 मुलांकडून करून घेण्यात येणारी तयारी, मुलांकडून असलेल्या अपेक्षा आणि मुले यशस्वी होण्यासाठी भारतीय पालकांकडून दिला जाणारा भर अधिक असतो. त्याकरता शिस्तबद्ध प्रयत्न असतात. या स्थलांतरित भारतीयांचा ध्यास आणि प्रसंगी कडवेपणासुद्धा अमेरिकन घरांच्या जवळजवळ व्यस्त प्रमाणात असतो.
 प्रतिक्रि या  आणि वास्तव
 आज अमेरिकेतला आशियाई  लोकांचा वाढता प्रभाव, आर्थिक सबळता नजरेत भरणारी आहे. इतर अमेरिकन आशियाई स्थलांतरितांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. या कौतुकाच्या, अचंब्याच्या सोबतीने असूयाही अर्थातच आहे. आशियाई वंशाच्या लोकांमुळे आपली संधी हिरावली जाते आहे याची दुखरी कळ अमेरिकनांच्या मनात असतेच. त्याचा परिणाम म्हणजे  यशाला वर्णाचा व वंशाचा रंग द्यावासा वाटणो! यात अमेरिकन माध्यमे हल्ली जास्त आग्रही होताना दिसतात.
यावर्षी ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’मध्ये फायनलला आलेल्यांमध्ये दहापैकी सात विद्यार्थी भारतीय वंशाचे होते. त्यापैकी सर्वाचा हा किमान दुसरा वा तिसरा प्रयत्न होता. पालकांची आणि मुलांची जिद्द यातून दिसते. हे यश अमेरिकनांच्या डोळय़ात भरणारे (आणि सलणार) आहे! त्यामुळे मग झटून अभ्यास करणारी ही मुले आनंद, असूया, शेरेबाजी अशा विविध (भारतीय  आणि अमेरिकन अशा दोन्ही घटकांकडून) सामाजिक प्रतिक्रियांना सामोरी जातात. 
हे चालूच राहील. स्थलांतरित भारतीयांच्या पुढील पिढय़ा ‘स्पेलिंग बी’पेक्षा वेगळा मार्ग निवडतील.
यश मिळवण्याबरोबर भारतीयांच्या पुढील पिढय़ांनी इथे अधिक एकजुटीने राहणो महत्त्वाचे आहे हेसुद्धा त्यांना उमगले आहे. जास्तीत जास्त लोकांनी राजकीय क्षेत्रत शिरकाव करणो हा या स्थलांतरितांसाठी पुढचा मार्ग असेल, हे नक्की!
 
 
 
‘स्पेलिंग बी’ आणि 
स्थलांतरित भारतीय
अमेरिकेच्या आर्थिक/सामाजिक क्षेत्रतील भारतीयांच्या वर्चस्वामागे असलेली सामाजिक, आर्थिक  आणि सांस्कृतिक पाश्र्वभूमी समजून घेतली पाहिजे.
स्थलांतरित भारतीयांची काही वैशिष्टय़े आहेत-
 स्पर्धात्मक स्वभाव आणि यशाचा ध्यास हा त्यांचा स्थायीभाव आहे.
 अमेरिकेत कायमस्वरूपी वा काही काळासाठी राहणारे भारतीय घेतले तरी त्यांच्यापैकी साधारण 75 टक्क्याहून अधिकजण आर्थिकदृष्टय़ा सरासरी इतर अमेरिकनांपेक्षा सबळ आहेत. 
 या भारतीयांपैकी जवळजवळ 8क् टक्के लोकांना इंग्रजी लिहिता वाचता येते.
 अमेरिकेत उपलब्ध असलेले विविध प्रकारचे  आणि विषयातले खासगी आणि सार्वजनिक असे सर्व शिक्षण ते आपल्या मुलांना देतात.
 भारतातून आलेले पालक आईवडील दोघेही (बहुतांशी आई, जी करिअरपेक्षा मुलांना महत्त्व देते) मुलांचा अभ्यास घेतात, मुलांकरता वेळ देतात. मुलांना प्राधान्य देतात.
 
गेल्या 17 वर्षातले
सलग ‘भारतीय’ यश
स्पेलिंग बी :  2015 - वन्या शिवशंकर  गोकुल वेंकटाचलम
 
2014 - श्रीराम. जे. हतकर    अनशुन सुजोय
2013 - अरविंद महांकाळ 
2012- स्निग्धा नंदीपती
2011- सुकन्या रॉय
2010 - अनामिका वीरमणी
2009 - काव्या शिवशंकर
2008- समीर मिश्र
2007- इव्हान एम. ओ डॉनी
2006 - केरी क्लोज
2005- अनुराग कश्यप
2004- डेव्हिड तिदमर्ष
2003- साई. आर. गुंटुरी
2002- प्रत्युष बुध्दीगा
2001- सीमन कॉंन्ले 
2000- जॉजर्.ए. थम्पी
1999- नुपूर लाल
 
( अमेरिकेत न्यू जर्सी येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका 'साहित्य संस्कृती' या संकेतस्थळाच्या संस्थापक संचालक आहेत.)

 

Web Title: American Success of American Spelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.