पोषाख आणि गणवेश !
By admin | Published: February 19, 2016 06:39 PM2016-02-19T18:39:24+5:302016-02-19T18:39:24+5:30
माणसाने घातलेले पोषाख बोलके असतात. माणसे गप्प बसून असली तरी त्यांचे पोषाख बोलतात. जगातल्या हुशार माणसांनी हे नीट ओळखले आहे
Next
(अपेयपान)
- सचिन कुंडलकर
विशिष्ट वेशभूषा केवळ
परिधानाखेरीज बरेच काही सांगते.
काळे बुरखे घातलेल्या बायका,
भगवे कपडे लपेटलेल्या साध्वी, मुल्ला-मौलवी,
घरी पूजेला येणारे गुरुजी,
कुंभमेळा गाजवणारे साधू,
परदेशात दिसणारे
ज्यू धर्मगुरूंचे समूह,
चर्चमधले पाद्री.
या सगळ्या माणसांची
मग आपोआप भीती
आणि दहशत बसते.
- हे एक प्रकारचे
राजकारणच आहे.
माणसाने घातलेले पोषाख बोलके असतात. माणसे गप्प बसून असली तरी त्यांचे पोषाख बोलतात. जगातल्या हुशार माणसांनी हे नीट ओळखले आहे आणि त्यामुळे जाणती माणसे नेहमीच आपल्या वेशभूषेबाबत जागरूक असलेली आपण पाहतो. महात्मा गांधींपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत अनेक अनेक जाणत्या व्यक्तींनी स्वत:च्या वेशभूषेचा नीट आखीव विचार केला आहे असे आपल्याला दिसेल. अनेक राजकीय नेते, धर्मगुरू, गायक, वादक, नट, अध्यात्म पंडित, योगगुरू अशा अनेकांना जगभर स्वत:ची ताकद ठसवण्यासाठी एक विशिष्ट वेशभूषा लागते. नवीन काळामधील ‘ब्रॅण्डिंग’चे शास्त्र विकसित होण्याच्या फार पूर्वीपासून माणसाने आपल्या विशिष्ट वेशभूषेचा वापर करून घेतलेला आहे.
धर्म हा भारतातीलच नाही, तर जगातीलच सगळ्यात मोठा व्यवसाय आणि उलाढाल असल्याने धार्मिक वेशभूषा करणा:या लोकांना एक उगीचच जास्त पवित्र आणि उदात्त असण्याचे बळ सामान्य माणूस अतिशय आपसूकपणो बहाल करतो. नव्या काळात जगातील सर्व माणसांची वेशभूषा एकसारखी होत जात असताना, अनेक माणसे धर्मात किंवा धर्मग्रंथात लिहून ठेवलेली वेशभूषा आग्रहाने करत राहतात . धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देशांमध्ये वावरताना दुराग्रहाने स्वत:चे वेगळेपण आपल्या धार्मिक वेशभूषेने जपत राहतात आणि मोठय़ा प्रमाणात स्वत:च्या धर्माचे अप्रत्यक्षपणो शक्तिप्रदर्शन करत बसतात. मला स्वत:ला असल्या माणसांची अतिशय भीती वाटते. बाबरी मशीद पडल्यानंतर भारतात ज्या जातीय दंगली झाल्या, त्यामुळे माङया पिढीच्या मुलांना धर्म आणि जातीयवाद कळायला आणि त्याचे वाईट परिणाम जाणवायला जास्त मदत झाली. ज्या गोष्टीबद्दल आम्ही सगळे अतिशय निवांत, निष्काळजी आणि अज्ञानी होतो ती गोष्ट म्हणजे धर्म आणि जात. बाबरी मशीद पडल्यावर आमच्या आजूबाजूच्या काळात धर्माविषयी अतिशय दक्षता असण्याचे वातावरण तयार झाले. या काळातील माझी सगळ्यात मोठी आठवण म्हणजे धार्मिक पेहराव केलेल्या व्यक्तीची अतिशय दहशत बसणो, त्या व्यक्तीची भयंकर भीती वाटणो आणि त्या व्यक्तीबद्दल मनात घृणा तयार होणो. काळे बुरखे घातलेल्या बायका, भगवे कपडे लपेटलेल्या साध्वी, मुल्ला-मौलवी, घरी पूजेला येणारे गुरुजी, रस्त्यात फिरणारे किंवा कुंभमेळा गाजवणारे साधू, परदेशी शहरांमध्ये फिरताना दिसणारे ज्यू धर्मगुरूंचे समूह, चर्चमधले पाद्री या सगळ्या माणसांची भीती आणि दहशत बसण्याचे कारण हे की आम्ही तोपर्यंत धर्माचा संबंध दहशतवादाशी, दंगलींशी आणि विध्वंसाशी असतो हे न शिकलो होतो, न असे काही भयंकर आम्ही कुणीही अनुभवले होते. अतिशय उग्रपणो अनेक धर्माची माणसे आपापल्या धर्माने सांगितलेले पेहराव घालून टीव्हीवर भाषणो देताना, सभांमध्ये आरडाओरडा करत बोलताना आम्ही त्या काळात पाहिली. त्याचा हा परिणाम असावा. मला आज शहरांमध्ये दैनंदिन आयुष्य जगताना, रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये, स्टेशनवर. कोणत्याही धर्माची ठरावीक वेशभूषा केलेली स्त्री किंवा पुरु ष पाहिला की बॉम्ब किंवा दंगल आठवते. मला अशा माणसांची अतिशय किळस येते. त्यांची भीती वाटते. अशा पारंपरिक भडक माणसांच्या संगतीत मला अजिबातच सुरक्षित वाटत नाही, मग त्या माणसाची जात आणि धर्म कोणताही असो.
वेशभूषेचा निर्णय हा व्यक्तिगत असला तरी अनेकवेळा तो नुसताच व्यक्तिगत नसतो. कारण सर्वसामान्य माणसांना स्वत:चा निर्णय आणि स्वत:चा वेगळा विचार करायचा नसतो. कुणीतरी आखून दिलेल्या मार्गाला धर्म आणि परंपरा असे म्हणून ती मुकाटपणो आयुष्य घालवत असतात. धार्मिक वेशभूषा ही आपल्याला ‘मी अमुक एक धर्माचे पालन करणारा किंवा करणारी आहे’ असे ेसांगते. तात्त्विकदृष्टय़ा त्यात गैर असे काहीच नाही. पण जग तत्त्वाने कधीच चालत नाही. आजच्या काळात जेव्हा शहरी दैनंदिन जीवनात बहुतांशी माणसे एक प्रकारचे सोपे, समान आणि धर्मनिरपेक्ष पोषाख घालतात. त्यांच्यात मध्येच धार्मिक ग्रंथाबरहुकूम पोषाख केलेली माणसे आली की ती माणसे त्या जागी वेगळी ऊर्जा तयार करतात. ती ऊर्जा उग्रवादी आणि राजकीय असू शकते. त्यांचा पोषाख आता नुसते ‘मी विशिष्ट धर्माचे पालन करणारी व्यक्ती आहे’ असे सांगत नाही, तर ‘माझा धर्म मोठा आहे, तुम्ही इतर आहात आणि मी तुमच्यापेक्षा विशिष्ट आहे’ असे सांगतो.
आपल्या जाती, आपले व्यवसाय आणि आपले पारंपरिक पोषाख याचा काहीही संबंध आजच्या काळात उरलेला नाही. आजच्या काळातले मुंबईतले कोळी ‘वल्हव रे नाखवा’ या गाण्यात घालतात तसले पोषाख घालून समुद्रावर जात नाहीत. ते टी-शर्ट आणि पॅण्ट घालतात. आमच्या आजूबाजूला राहणारी माणसे असे कोणतेही कपडे घालत नाहीत; ज्यामुळे त्यांची जात किंवा धर्म आपल्याला कळेल. असे असणो मला आवडते.
पोषाख, दिसणो या सगळ्याने सारखे असणा:या माणसांनी भरलेल्या शहरात असताना माणसे धार्मिक पोषाख निवडतात तेव्हा त्यामागे नक्कीच सामाजिक आणि राजकीय डावपेच असतात. त्या माणसांचे नसले तरी त्या माणसांना ‘असे पोषाख आजच्या जगात घाला’ असे सांगणा:या त्यांच्या नेत्यांचे, धर्मगुरूंचे, राजकीय सल्लागारांचे नक्कीच असतात. अशी माणसे साधी आणि विचार न करता असे पोषाख घालत असतील असे मला कधीही वाटत नाही. माणूस स्वत:ला इतरांपेक्षा वेगळा असे मुद्दाम काढू पाहतो तेव्हा तो कधीही भाबडा असू शकत नाही.
भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला धर्माचार, विचार, पोषाख यांचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पण दुर्दैवाने आजच्या काळात धर्माचा संबंध शांतता आणि पावित्र्याशी उरलेला नाही. धर्म आणि दहशतवाद किंवा धर्म आणि राजकारण ही समीकरणो पक्की असलेल्या काळात आम्ही जन्माला आलेलो असल्याने धार्मिक माणसांची भीती वाटणो आमच्या बाबतीत साहजिकही आहेच.
तीच गोष्ट गणवेशाची. एकसारखे गणवेश हे शक्तिप्रदर्शन आणि भीती तयार करण्यासाठी निर्माण केले जातात. अशी माणसे आजच्या काळात सक्काळी रस्त्याने चालत गेली की त्यांची भीती वाटते. अशी भीती वाटावी हेच त्या गणवेश तयार करणा:या विचारवंताला हवे असते. आणि त्यात तो यशस्वी होतो. समाजात गणवेश घालून फिरणा:या माणसांविषयी दहशत तयार होते. पोषाख हा माणसाला सत्ता उभी करून इतरांना ताब्यात ठेवायला नेहमीच मदत करत असतो. आणि गणवेश हा त्यातला महत्त्वाचा प्रकार आहे.
फ्रान्ससारख्या काही पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये धार्मिक वेशभूषा करून समाजात वावरून अस्वस्थ वातावरण तयार करण्याला विरोध होतो आहे आणि त्यामुळे तिथे बुरखाबंदीसारखे कायदे तयार होऊन राजकारणाची नवी समीकरणो उमटत आहेत. भारतात अजूनही सामाजिक आचार-विचार आणि वैयक्तिक आयुष्य यांची गल्लत आणि फारकत असल्याने कोणत्याही प्रकारची समानता आणि सारखेपणा रोजच्या जीवनात येणो शक्यच नाही. आपल्या बहुरंगी आणि बहुपदरी भारतीय समाजजीवनाच्या दृष्टीने हे योग्य जरी असले, तरी नागरिकाने निवडलेला विशिष्ट पोषाख आणि त्याचे विचार याची सांगड जर घातली तर धर्माधिष्ठित कोणत्याही गोष्टीची दहशत आणि भीती वाटण्याचे आजचे दिवस आहेत. याचा प्रत्यय रोज घडणा:या घटनांमधून दिवसेंदिवस प्रखरपणो येतो आहे.
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com