कथा भारतीय सैन्यदलाच्या : महिलांसाठी लष्कराचे दरवाजे खुले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 07:00 AM2019-11-17T07:00:00+5:302019-11-17T07:00:13+5:30

- कर्नल वि. ना. तांबेकर भारतीय महिलांना लष्कराचे दरवाजे आता ‘सताड’ उघडले आहेत. ‘सताड’ म्हणण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत महिलांना ...

Army doors open for women | कथा भारतीय सैन्यदलाच्या : महिलांसाठी लष्कराचे दरवाजे खुले 

कथा भारतीय सैन्यदलाच्या : महिलांसाठी लष्कराचे दरवाजे खुले 

googlenewsNext

- कर्नल वि. ना. तांबेकर
भारतीय महिलांना लष्कराचे दरवाजे आता ‘सताड’ उघडले आहेत. ‘सताड’ म्हणण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत महिलांना लष्करात फक्त अधिकारी आॅफिसर म्हणून प्रवेश होता. शिपाई-सोल्जर म्हणून नव्हता; परंतु यावर्षी जूनपासून १७।। ते २१ वर्षाच्या महिलांना शिपाई-सोल्जर-जवान म्हणून प्रवेश देण्याची प्रक्रिया इंडियन आर्मीच्या भूदलाने सुरू केली आहे; परंतु याची माहिती बऱ्याच जणांना नाही.महाराष्ट्रात तर याबद्दल अज्ञान दिसते. ज्याप्रमाणे पुरुषांना शिपाई-जवान म्हणून प्रवेश मिळत असे, त्याच पद्धतीप्रमाणे आता महिलांनाही आर्मीच्या भूदलात प्रवेश देण्यास जून २०१९ पासून सुरुवात करण्यात आली आहे. हा प्रवेश कसा मिळतो? कुणाला मिळतो? याची नियमावली काय असते? याची माहिती या लेखात देण्यात आली आहे. यावर्षी केवळ १०० महिलांची निवड करण्यात येत आहे आणि ही भरती लष्कराच्या मिलिटरी पोलीस (स्र.) विभागापासून होणार असून, नंतर ती स्टेप बाय स्टेप (टप्प्याटप्प्याने) इतर विभागांत म्हणजे ई. एम. ई., ए. एस. सी. सिग्नल इ. विभागातही होणार आहे. मिलिटरी पोलीस या लष्कराच्या विभागात प्रथमच शिपाई-सोल्जर म्हणून महिलांना प्रवेश देण्यात आला आहे. यानंतर लष्कराच्या इतर विभागांत म्हणजेच सिग्नल इलेक्ट्रॉनिक्स व मेकॅनिकल इंजिनिअरिंग (एटए) आर्मी एव्हिएशन, आर्मी एअर डिफेन्स, आर्मी सर्व्हिस कोअर, आर्मी आॅर्डनन्स कोअर आणि आर्मी इंटेलिजन्स विभागात महिलांना शिपाई म्हणून प्रवेश दिला जाणार आहे.
 

पात्रता काय हवी?
अर्जदार महिला १७।। ते २१ या वयोमर्यादेतच असावी, लष्करातील विधवांच्याबाबतीत मात्र ही मर्यादा ३० वर्षांपर्यंत आहे. त्यांची उंची कमीत कमी १४२ सें. मी. हवी व त्यानुसार त्यांचे वजन असावे. मुलींना कुठलीही व्याधी किंवा व्यंग नसावे. मुख्य अट म्हणजे उमेदवार अविवाहित असावी.
 

निवड कशी व कुठे?
महिला उमेदवारांनी आपल्या सर्व प्रमाणपत्रांसह म्हणजेच जातीचा, वयाचा दाखला, शिक्षणाचा, अविवाहित असल्याचा, सैनिकाची मुलगी असल्यास ते प्रमाणपत्र यांसह ठरलेल्या मुदतीत आॅनलाईन अर्ज करावयाचा आहे. ठरलेल्या तारखेनंतर अर्ज केल्यास तो स्वीकारला जात नाही. त्या अर्जाची छाननी करून, सर्व कागदपत्रे योग्य असलेल्या उमेदवारांचे गुणवत्तेनुसार क्रमांक लावण्यात येतात. त्यानंतर, जितक्या जागा भरावयाच्या आहेत, त्यापेक्षा जास्त महिला पुढील निवड प्रक्रियेसाठी हजर राहण्यासाठी आॅनलाईन कॉल दिले जातात. त्यामध्ये केव्हा, कुठे सर्व मूळ प्रमाणपत्रांसह (ङ्मफकॠकठअछ) हजर व्हायचे, याची माहिती असते. हे सरकारी अधिकृत निमंत्रणच म्हणा! सध्या या प्रवेशप्रक्रियेसाठी अंबाला, लखनौ, जबलपूर, शिलाँग व बेळगाव या केंद्रांपैकी उमेदवाराच्या जवळच्या केंद्रामध्ये बोलाविले जाते. महाराष्ट्रीयन उमेदवारांना बेळगाव हे सोयीचे आहे. या केंद्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उमेदवाराने भरतीला जाताना सर्व मूळ (ङ्म१्रॅ्रल्लं’) प्रमाणपत्रे, दोन फोटो घेऊन जाणे भाग आहे; अन्यथा तिला पुढच्या चाचण्या देता येत नाहीत. हे महत्त्वाचे आहे.
 

चाचण्या कोणत्या?
प्रमाणपत्राची, वयाची खात्री झाल्यानंतर उमेदवारांना १६०० मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी इ. समावेश असतो. त्यामध्ये उत्तीर्ण होणाºया महिलांना गुणानुक्रमे निवडले जाते. निवड झालेल्या उमेदवारांना लगेच त्याच ठिकाणी लेखी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा ङ्मु्नीू३्र५ी असते. साधारण एक तासाच्या या परीक्षेत सामान्यज्ञान, गणित, विज्ञान इ. विषयांवर नेहमीचे सोपे प्रश्न असतात. त्याची धास्ती करण्यासारखी नसते. या परीक्षेचा निकाल तेथेच भरती केंद्रात लगेच कळतो. त्यात उत्तीर्ण होणाºया उमेदवारांना गुणानुक्रमे निवडले जाते. निवड झालेल्या महिलांना मेडिकल चाचणीसाठी तिथल्याच मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते. वैद्यकीय तपासणीमध्ये उत्तीर्ण होणाºया महिलांची पुढील शिक्षणासाठी निवड करून त्यांना तेथेच कळविले जाते. पुढील प्रशिक्षणासाठी कोणत्या सेंटरला, केव्हा हजर व्हायचे, तेही सांगितले जाते व आॅनलाईन कॉल लेटरही पाठविले जाते. त्या लेटरची कॉपी घेऊन निवड झालेल्या उमेदवारांनी त्या त्या तारखेला व वेळेला त्या सेंटरला हजर राहणे महत्त्वाचे आहे; अन्यथा तिच्याऐवजी दुसºया उमेदवाराला बोलाविले जाते. सध्या एकूण १०० महिलांची निवड करण्यात येत असून, त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. सैन्य दलात सध्या २०१९-२० वर्षात एकूण १७०० महिलांची निवड टप्प्याटप्प्याने होणार आहे. निवड झालेल्या पहिल्या तुकडीचे (बॅचचे) प्रशिक्षण बंगलोर येथील अ.र.उ. सेंटर येथे डिसेंबरपासून सुरू होत आहे. आता ज्या मुलींनी अर्ज केले नसतील, त्यांना यापुढील भरती प्रक्रियेमध्ये सामील होता येईल; मात्र त्यासाठी आता यापुढे येणाऱ्या भरती नोटिफिकेशनकडे लक्ष ठेवले पाहिजे आणि ठरल्या तारखेच्या आत सर्व प्रमाणपत्रांसह अर्ज केले पाहिजेत. तरच त्यांना भरतीसाठी कॉल येईल. हे गृहीत धरून इच्छुक महिलांनी तयारीत राहिले पाहिजे.
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)

Web Title: Army doors open for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.